लाइफ स्टाइल

गायीच्या शेणापासून बनवलेल्या राखीला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी

Rashmi Dongre

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर सुंदर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यामिनित्तने गेल्या काही आठवड्यांपासून रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून गेला आहे. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखी निवडण्याचा प्रयत्न करत असते. भारताप्रमाणेच परदेशातही रक्षाबंधन हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी यंदाचे रक्षाबंधन वेगळे असणार आहे.

यावर्षी परदेशात राहणाऱ्या बहिणी गायीच्या शेणापासून बनवलेली राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधणार आहेत. यासाठीची तयारी आता शेवटच्या टप्प्यावर असून लवकरच या राख्यांची डिलिव्हरी केली जाणार आहे. या राख्या बनवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जयपूरहून १९२ मेट्रिक टॅन गायीच्या शेणाची निर्यात करण्यात आली आहे.

हॅनिमन चॅरिटेबल मिशन सोसायटीच्या सेक्रेटरी मोनिका गुप्ता म्हणाल्या की, लोक गायीचा आदर करतात. त्यामुळेच शेण आणि औषधी बियांपासून राखी बनवली जात आहे. गायीचे शेण उन्हात चांगले वाळवले जाते, त्यामुळे शेणाचा वास ९५ टक्क्यांपर्यंत दूर होतो. यानंतर, गाईचे तूप, हळद, पांढरी चिकणमाती आणि चंदन मिसळून कोरड्या शेणाची बारीक पावडर इतर सेंद्रिय पदार्थांसह पिठाप्रमाणे मळून रंगीबेरंगी राख्या बनवतात.

संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. बहुतेक लोक काही वेळाने राखी काढतात आणि रक्षाबंधनानंतर काढून टाकली जाते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली राखी काही दिवसांनी कचऱ्यात सापडते. या शेणाच्या राख्या पर्यावरणपूरक असण्यासोबतच यामध्ये तुळशी, अश्वगंधा, काळमेघ आदी बिया टाकल्या जातात. त्यामुळे राखी फेकण्याऐवजी लोकांनी कुंडीत किंवा घराच्या अंगणात ठेवावी. या उपक्रमामुळे वृक्षारोपण होण्यास मदत होणार आहे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू