The trend of terracotta jewellery is on the rise(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  The trend of terracotta jewellery is on the rise(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Terracotta Jewellery: टेराकोटा ज्वेलरीचा वाढतोय ट्रेंड, मातीच्या दागिन्यांनी महिलांना घातली भुरळ!

Terracotta Jewellery: टेराकोटा ज्वेलरी सध्या फॅशनविश्वात लोकप्रिय होत असून, मातीपासून तयार होणारे हे आकर्षक दागिने पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर सुंदर दिसतात. विविध रंग, नक्षीकाम आणि हटके डिझाइन्समुळे नेकलेस, झुमके, चोकर आणि बांगड्यांना विशेष पसंती मिळत आहे. जाणून घ्या टेराकोटा ज्वेलरीचे प्रकार, स्टाइलिंग टिप्स आणि दागिन्यांची काळजी घेण्याच्या सोप्या पद्धती.

siddhi
  • टेराकोटा ज्वेलरीचे प्रकार: नेकलेस, चोकर, झुमके, बांगड्या आणि पेंडंट अशा विविध डिझाइन्समध्ये हे दागिने उपलब्ध आहेत.

  • पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइल: साडी, कुर्ती, कॉटन ड्रेस आणि इंडो-वेस्टर्न आउटफिट्सवर टेराकोटा ज्वेलरी आकर्षक दिसते.

  • दागिन्यांची योग्य काळजी: दागिने पाणी, परफ्यूम आणि रसायनांपासून दूर ठेवून कोरड्या कापडाने स्वच्छ करावेत.

सध्या फॅशनविश्वात पारंपरिक आणि नैसर्गिक वस्तूंपासून तयार होणाऱ्या दागिन्यांना विशेष पसंती मिळताना दिसत आहे. यामध्ये टेराकोटा ज्वेलरीचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.मातीपासून बनणारे हे दागिने त्यांच्या विविध आकारांसाठी अधिकच प्रसिद्ध आहेत. मातीपासून तयार केले जाणारे हे दागिने दिसायला आकर्षक, कलात्मक आणि वेगळे असतात. आपल्याला हवा असलेला आकार सध्या करता येतो. विशेष म्हणजे पारंपरिक साडीपासून ते मॉडर्न वेस्टर्न कपड्यांपर्यंत विविध प्रकारच्या आउटफिट्सवर हे दागिने सुंदर दिसतात. त्यामुळे कॉलेज तरुणींपासून ते नोकरदार महिलांपर्यंत अनेक जणी टेराकोटा ज्वेलरीला पसंती देत आहेत.

१. टेराकोटा ज्वेलरी म्हणजे काय?

टेराकोटा म्हणजे भाजलेली माती. विशिष्ट प्रकारच्या चिकणमातीपासून हे दागिने तयार केले जातात. सर्वप्रथम मातीला हवा तसा आकार दिला जातो. त्यानंतर ती व्यवस्थित वाळवून भट्टीमध्ये भाजली जाते.त्याने दागिन्यांना कडकपणा येतो. पुढे त्यावर रंगकाम, नक्षीकाम आणि फिनिशिंग केले जाते. त्यामुळे या दागिन्यांना आकर्षक आणि टिकाऊ स्वरूप मिळते. अनेक कारागीर हे दागिने हाताने तयार करतात.त्यामुळे अधिकच सुंदर दिसतात.

२. टेराकोटा ज्वेलरीचे कोणकोणते विविध प्रकार आहेत?

टेराकोटा ज्वेलरीमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये लांब नेकलेस, चोकर, झुमके, लहान कानातले, बांगड्या, पेंडंट, अंगठ्या आणि मंगळसूत्र अशा विविध दागिन्यांचा समावेश होतो. यामध्ये फुलांची नक्षी, मोर, पानांचे आकार, सूर्यफूल, भौमितिक डिझाइन आणि पारंपरिक कलाकुसर पाहायला मिळते.

३. रंग आणि डिझाइनची खासियत काय आहे?

टेराकोटा ज्वेलरीमध्ये लाल, काळा, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा आणि मातीचा नैसर्गिक रंग वापरला जातो. काही दागिन्यांवर वारली आर्ट, मधुबनी पेंटिंग आणि पारंपरिक भारतीय नक्षीकाम केलेले असते. त्यामुळे प्रत्येक दागिन्याला वेगळा लूक मिळतो. साध्या ड्रेसवर उठावदार दिसणारे हे दागिने फॅशनप्रेमींची पसंती ठरत आहेत.तसेच हे दागिने साडीवरही छान दिसतात.

४. कोणत्या कपड्यांवर घालू शकता?

कॉटन साडी, पैठणी, खादी कुर्ती, अनारकली ड्रेस आणि इंडो-वेस्टर्न कपड्यांवर टेराकोटा ज्वेलरी छान दिसते.तसेच ऑफिससाठी छोटे कानातले किंवा साधे पेंडंट वापरता येतात.तसेच जर तुम्ही ड्रेस घालत असला तर त्यावर देखील हे दागिने सुंदर दिसतात तर सण-समारंभ आणि विशेष कार्यक्रमांसाठी मोठे नेकलेस, झुमके आणि मॅचिंग बांगड्या निवडता येतात.

५. टेराकोटा ज्वेलरीची काळजी कशी घ्यावी?

हे दागिने मातीपासून तयार केले जात असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी, परफ्यूम आणि रासायनिक पदार्थांपासून ते दूर ठेवावेत.ज्याने ते ओलसर होणार नाहीत. वापरल्यानंतर मऊ आणि कोरड्या कापडाने स्वच्छ करावेत. तसेच दागिने स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवावेत. ते खाली पडणार नाहीत किंवा एकमेकांवर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी. पारंपरिक हस्तकला, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर संगम असलेली टेराकोटा ज्वेलरी तुमच्या लूकला आकर्षक आणि वेगळा अंदाज देऊ शकते. त्यामुळे यंदा दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये या मातीच्या दागिन्यांचा समावेश करण्याचा पर्याय नक्की विचारात घ्या.

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, ४ जखमी

Eknath Shinde : गडकोटांचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी; शिवरायांकडून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, एकनाथ शिंदे यांचे आवाहन

गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

Avada Group Maharashtra: शेतात सौरऊर्जेचा प्रकाश, तरुणांसाठी रोजगाराची संधी! ‘कोण होणार करोडपती’मध्ये उलगडला आवाडाचा प्रवास

Wipro च्या कॅम्पसबाहेर उमेदवारांची प्रचंड रांग! हैदराबादच्या व्हायरल व्हिडिओने मांडले आयटी क्षेत्रातील वास्तव