लाइफ स्टाइल

शिवलिंगाला तरुणींनी स्पर्श का करु नये? जाणून घ्या

Rashmi Dongre

श्रावण महिना सुरू आहे. देवांचे देव महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.  यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी (Shrawan Somvar) व्रत केलं जातं. आवडीचा जोडीदार आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणे, शिव-पार्वतीची पूजा (Shiva-Parvati Puja) केल्यानं सुख-समृद्धी प्राप्त होते. श्रावण महिन्यात शिवप्रभूंची (Lord Shiva) आराधना केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात.

तरुणींनी शिवलिंगाला स्‍पर्श करू नये

हिंदू धर्म-पुराणात शिवलिंगाच्या पूजनाच्या अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. भगवान भोलेनाथाची मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे, तर शिवलिंगाचा केवळ रुद्राभिषेक (Rudrabhishek) केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक करताना काही बाबी आपण लक्षात घ्यायला हव्यात. पूजा करताना तरुणींनी (Unmarried Girls) शिवलिंगाला चुकूनही स्‍पर्श करू नये. तरुणींनी शिवलिंगाला (Shivling) स्पर्श करणे वर्जित मानले जाते.

शिवलिंग एक दिव्‍य ऊर्जेचा प्रतीक मानले जाते. विवाहित पुरुष शिवलिंगाची मनापासून पूजा करत असतील तर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि त्यांना संतती प्राप्त होते. अविवाहीत तरुणींनी संततीबाबत विचार करणे मर्यादेच्या पलिकडे आहे. त्यामुळे त्यांनी चुकूनही शिवलिंगाला स्पर्श करू नये असे मानले जाते.

याशिवाय विवाहित महिलांनी शिवलिंगाला स्‍पर्श केल्यास माता पार्वती (Devi Parvati) क्रोधित होतात असे मानले जाते. एवढंच नाही तर तपस्‍यालीन शिवपार्वतीची तपस्या भंग होते अशी देखील मान्यता आहे. महिला आणि तरुणींनी शिवलिंगांची लांबूनच पूजा करावी आणि दूरून दर्शन घ्यावे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू