Look Back 2022

कसं होतं राज्यातील राजकीय वर्ष...,जाणून घ्या 2022 मधील 10 महत्त्वाच्या घडामोडी

2022 वर्षाला बाय-बाय म्हणताना, 2023 या नूतन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. 2022 या वर्षात राजकीय क्षेत्रात अनेक ऐतिहासिक आणि महत्वाच्या घडामोडी घडल्या. मविआ सरकार जाऊन राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. 2022 या वर्षाचा राजकीय क्षेतातील आढावा घेताना अनेक घटना डोळ्यासमोर येतात. 2022 या वर्षातील पाहूया 10 महत्त्वाच्या घडामोडी...

Amrut Sutar

1) शिंदे बंडाळी गटातील 39 आमदारांचे बंड

जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी शिंदे गटाचे ऐतिहासिक बंडाला सुरुवात झाले. एकनाथ शिंदेसोबत काही आमदार आधी सुरत, गुवाहाटी, व गोव्याला गेले. सुरुवातीला 20-25 संख्या असलेले आमदार 39 वर गेले. आणि तिथूनच सत्तांतराला सुरुवात झाली.

2) राज्यात सत्तांतर शिंदे-फडणवीस सरकारचा उदय

शिंदे गटाचे मोठ्या व ऐतिहासिक बंडानंतर अखेर 30 जून 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार देवेंद्र फडणवीसांनी स्विकारला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांनाही आपल्या पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.

3) छ. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांचे व भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छ. शिवाजी महाराज, म. जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्यं केली. तसेच भाजपा नेत्यांनी देखील छ. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळं बराच वाद, टिका, मोर्चे व आंदोलनं काढण्यात आली, तर राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी अजून होत आहे.

4) राज्यसभा महाराष्ट्र निवडणूक सर्व पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली

राज्यसभा निवडणूक मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी निकाल लागला. यात भाजपचे 3, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला. पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ही निवडणूक सर्व पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली.

5) विधान परिषद निवडणूक, आणि देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक

सत्तांतराची आधी विधान परिषद निवडणुकीत भाजपाची रणनिती व फडणवीसांचा मास्टर स्ट्रोकमुळं भाजपाने गुलाल उधळला. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड असे पाचही उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे सचिन अहिर व आमशा पाडवी तर राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे उमेदवार विजयी झाले. मात्र, काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला.

6) खासदार संजय राऊतांना अटक आणि 103 दिवसानंतर सुटका

मुलुख मैदानीतील शिवसेनेची तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊतांना गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 1 ऑगस्ट 2022 रोजी अटक झाली. तब्बल 103 दिवसांनंतर राऊतांची तुरुंगातून सुटका झाली. यामुळं ठाकरे गटातील आत्मविश्वास वाढला.

7) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

6 डिसेंबर 2022 रोजी कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची बेळगामध्ये तोडफोड केली. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले, यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाड्यांची तोडफोड व काळे फासण्यात आले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विरोधात विधानसभेत एक इंचही जागा देणार नाही, असा ठराव मांडला. हा वाद अजूनही सुरुच आहे.

8) दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटाची कोर्टात धाव

शिवसेनेचा अनेक वर्षापासून चालत आलेला प्रसिद्ध दसरा मेळाव्यावरुन शिंदे-ठाकरे गटाने शिवाजी पार्क हे मैदान मिळविण्यासाठी कोर्टात धाव घेतली. अखेर मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी न्यायालयानं ठाकरे गटाला दिली. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत पार पडला.

9) शिवसेना नाव व चिन्हावर शिंदे गटाचा दावा आणि निवडणूक आयोगाची भूमिका

शिंदे बंडाळी गटाने शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मूळ शिवसेनेवर, पक्षाच्या नावावर व चिन्हावर दावा केला. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले. चिन्हाचा वाद अजूनही सुरुच आहे.

10) हिवाळी अधिवेशनात भूखंड घोटाळा व दिशा सलियान प्रकरण गाजतेय

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांचे प्रश्नांवर चर्चा न होता वेगळ्याच कारणासाठी अधिवेशन गाजतेय. मुख्यमंत्री भूखंड घोटाळा, सीमावाद, राज्यपाल राजीनामा तसेच दिशा सलियान मृत्यू प्रकरणी विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये दररोज खडाजंगी पाहयला मिळते. तर दिशा सलियान मृत्यू प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू