जुने वर्ष संपत आले आहे. नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळेच गुगलवर (Google) कोरोनाशी निगडीत प्रश्न सर्वाधिक वेळा सर्च केला हेला. वर्षाच्या सुरुवातीला प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर (RT PCR) अहवालाची सर्वाधिक गरज होती. त्यामुळेच त्याच्याशी संबंधित प्रश्न जास्त विचारले गेले. या वर्षी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेले 5 आरोग्यविषयक प्रश्न (5 Health Questions Searched On Google) कोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
- लस घेतल्याचे प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे ?
कोरोनाची लस मिळाल्यानंतर सगळीकडे कोरोना प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली होती. यानंतर सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटवर अशा प्रश्नांचा भडीमार झाला होता. लसीकरण प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करायचे ? हा प्रश्न 2022 मध्ये सर्वात जास्त वेळा गुगलवर टाकून त्याचं उत्तर शोधण्यात आलं. तसेच देशातील लसींची नावेही इंटरनेटवर खूप शोधली गेली.
- सरोगसी म्हणजे काय ?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सरोगसीच्या मदतीने 2022मध्ये आई बनली. यानंतर साऊथ अभिनेत्री नयनतारानेही सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामुळे ही बातमी गुगलवर खूप सर्च झाली. या बातम्यांनंतर ‘सरोगसी म्हणजे काय’ याचा इंटरनेटवर प्रचंड शोध घेण्यात आला. ज्या महिलांना गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा त्यासंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या आहे त्यांच्यासाठी सरोगसी खूप उपयुक्त आहे. याचा सरळ अर्थ ‘सरोगेट गर्भ’ असा होतो.
- सामंथा रुथचा मायोसिटिस
फॅमिली मॅन-2 मध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने सांगितले की तिला मायोसिटिस आहे. यानंतर ‘मायोसिटिस म्हणजे काय?’ हा प्रश्न इंटरनेटवर खूप विचारला गेला. मायोसिटिस ही शरीरात उद्भवणारी एक दुर्मिळ स्थिती आहे. ज्यामध्ये शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि त्यांना खूप वेदना होतात. याचा त्रास झालेल्या व्यक्तीला चालताना चक्कर येऊ लागते. यामुळे त्याला उभे राहूनही खूप थकवा जाणवतो.
- चिया बियाणे आणि जवस
लोकांनी हिंदीमध्ये चिया बिया आणि जवसाच्या बियांबद्दल 2022 मध्ये, खूप शोध घेतला. खरं तर, कोविडमध्ये लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता खूप वाढली आहे. वास्तविक चिया बिया सुपरफूड मानल्या जातात. त्याचप्रमाणे जवसाच्या बियांचा उपयोग अनेक रोगांवर होतो. जवसाच्या बिया आणि चिया बियांचे नवीन ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. चिया बियांमध्ये नऊ प्रकारचे अमीनो एसिड असतात जे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी करतात.
- गरोदरपणात जुलाब कसे थांबवायचे ?
गरोदरपणात पोटाशी संबंधित समस्या सामान्य असतात. पण असे प्रश्न इंटरनेटवर विचारण्यात आले. गुगलच्या हाऊ टू या प्रश्नांमध्ये महिलांचा हा प्रश्न पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. गर्भधारणेदरम्यान स्टॉप मोशनशी संबंधित प्रश्न भारतात बरेच विचारले गेले. डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये बद्धकोष्ठता, जुलाब यासारखी अनेक लक्षणे दिसतात.