Drought mitigation through Employment Guarantee Scheme 
अकोला

रोजगार हमीतून दुष्काळ निवारण; कृषी विभागाच्या सचिवांचे निर्देश

पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून वनविभागाच्या तसेच गाळपेर जमिनीवर चारा लागवड करावी. शेतकऱ्यांना चारा लागवड आणि जलतारा यांसारखे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Krupadan Awale
  • अकोला जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.

  • विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्हीबी-जी राम जी) अंतर्गत अधिकाधिक कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • कृषी विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव परीमल सिंह यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर करण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्हीबी-जी राम जी) अंतर्गत अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. चारालागवड आणि जलसंचयनावर विशेष लक्ष केंद्रित करून कायमस्वरूपी मालमत्ता व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश कृषी विभागाचे सचिव तथा पालक सचिव परीमल सिंह यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सिंह म्हणाले, आगामी सहा महिन्यांसाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध राहील, या दृष्टीने पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार नियोजन करावे.

पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून वनविभागाच्या तसेच गाळपेर जमिनीवर चारा लागवड करावी. शेतकऱ्यांना चारा लागवड आणि जलतारा यांसारखे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करावे. व्हीबी-जी राम जी कायदा, २०२५ अंतर्गत कडधान्य लागवड, फळबाग लागवड, बंधारे बांधकाम आणि दुष्काळ निवारणाची कामे स्थानिक मजुरांकडून करून घ्यावीत. त्यामुळे स्थलांतर रोखून स्थानिक रोजगार उपलब्ध होईल.

जलतारा कामांसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा तांत्रिक सल्ला घ्यावा. पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीतील प्रलंबित प्रकरणांची तपासणी करावी. तसेच पीक विमा आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या कामांचा आढावा

बैठकीत पर्जन्यमान, खरीप पेरणी, पीक नुकसान, दुष्काळी सवलती, अग्रीम मदत, जलसाठा, चारा नियोजन, रोहयो मजूर उपस्थिती उपा आणि पीक विमा योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सादरीकरणातून माहिती दिली. बैठकीनंतर परीमल सिंह यांनी येळवण येथे संत्रा फळबाग, पोकरा योजनेंतर्गत शेततळे व यंत्र-अवजारे बँकेची पाहणी केली. तसेच कानशिवणी आणि कुरणखेड येथे आत्मा अंतर्गत रब्बी ज्वारी पीक आणि जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली.

दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन

संभाव्य पाणी व चाराटंचाईवर मात करण्यासाठी १२९ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत वॉर रूम आणि विशेष दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन केले आहे. ग्रामीण भागासाठी घुंगशी व काटेपूर्णा बॅरेजमधील जलसाठ्याचे नियोजन केले असून, तलाव-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, शेततळी, सिंचन विहिरी व बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत.

FAQ

1. अकोला जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी कोणते अभियान राबवले जाणार आहे?

विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्हीबी-जी राम जी) अंतर्गत विविध कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

2. दुष्काळ निवारणासाठी कोणत्या कामांवर विशेष भर देण्यात येणार आहे?

चारालागवड, जलसंचयन आणि कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

3. दुष्काळी परिस्थितीचा आढावा कोणी घेतला?

कृषी विभागाचे सचिव तथा पालक सचिव परीमल सिंह यांनी आढावा बैठक घेतली.

म्हशीवर स्वार बॅटमॅन आणि रिक्षात जोकर; जाणून घ्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे 'Desi Batman' AI व्हिडिओ नेमके कसे बनतात?

Air fryer foods: एअर फ्रायरमध्ये बनवा चविष्ट पदार्थ, कमी तेलात तयार होतील कुरकुरीत स्नॅक्स आणि गोड पदार्थ

Royal Enfield चा नवा धमाका! Himalayan 750 मध्ये मिळणार क्रूझ कंट्रोलसह दमदार इंजिन

Delhi Okhla Viral Video : वासराला घेऊन जाणाऱ्या बाईकचा गायीने केला पाठलाग; पोलिसांकडून तपास सुरू

Bronson Reid: WWE विश्वावर शोककळा! प्रसिद्ध रेसलर ब्रॉनसन रीड यांचे निधन; चाहत्यांना मोठा धक्का