अकोल्यात मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उंच इमारतीवर सुरक्षा साधनांविना मजुरांचे काम 
अकोला

अकोल्यात मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उंच इमारतीवर सुरक्षा साधनांविना मजुरांचे काम

सात ते आठ मजली इमारतीच्या उंचीवर कोणत्याही ठोस सुरक्षा व्यवस्थेविना मजुरांना काम करावे लागत असल्याने बांधकामस्थळावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Krupadan Awale
  • राधाकृष्ण प्लॉट परिसरातील बांधकामस्थळी मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न

  • ७ ते ८ मजली इमारतीवर सुरक्षा साधनांशिवाय काम

  • मजूर दोरखंडांच्या साहाय्याने उंचावर काम करताना दिसले

अकोला : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका मार्गावरील राधाकृष्ण प्लॉट परिसरात सुरू असलेल्या ७ ते ८ मजली इमारतीच्या बांधकामस्थळी मजुरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उंच इमारतीवर दोरखंडांच्या साहाय्याने काम करणारे मजूर कोणत्याही आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय काम करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच हे बांधकाम सुरू आहे. मात्र, येथे काम करणाऱ्या मजुरांकडे सुरक्षा पट्टे (सेफ्टी बेल्ट), हेल्मेट आणि सुरक्षा बूट यांसारखी मुलभूत साधने नसल्याचे दिसून येत आहे. सात ते आठ मजली इमारतीच्या उंचीवर कोणत्याही ठोस सुरक्षा व्यवस्थेविना मजुरांना काम करावे लागत असल्याने बांधकामस्थळावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी बांधकामस्थळी कामगारांच्या ८ सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांची आहे. उंचावर काम करताना कामगारांना सुरक्षा पट्टे, हेल्मेट, सुरक्षा जाळी (सेफ्टी नेट) तसेच आवश्यक इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

दरम्यान, बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्यास त्याची तपासणी करून नियमानुसार कारवाई केली जाईल. संबंधित बांधकामस्थळाची माहिती मिळाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारच्या बांधकामस्थळी उंचावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतरही संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी विविध नियम असताना त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भविष्यात एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास...

भविष्यात एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित बांधकामस्थळाची तातडीने पाहणी करून मजुरांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत, तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

FAQ

प्रश्न १ : बांधकामस्थळ कुठे आहे?
उत्तर : जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका मार्गावरील राधाकृष्ण प्लॉट परिसरात हे बांधकाम सुरू आहे.

प्रश्न २ : बांधकाम किती मजली आहे?
उत्तर : संबंधित इमारतीचे बांधकाम सात ते आठ मजली असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रश्न ३ : मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न का निर्माण झाला आहे?
उत्तर : उंच इमारतीवर मजूर दोरखंडांच्या साहाय्याने काम करताना दिसत असून, त्यांच्याकडे आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे निदर्शनास आले आहे.

मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले? म्हणत पतीचा संताप; पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार

Defence Stocks : डिफेंस शेअर्समध्ये तुफानी तेजी! BEML तब्बल 17% उसळला; BDL आणि HAL मध्येही जोरदार खरेदी, काय आहे कारण?

'सिलेक्टर्स, प्लीज आता...'; Vaibhav Suryavanshi बाबत श्रीकांत यांचा निवड समितीला 'हा' इशारा?

Mrudgandha Awards 2026 : ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; पं. सुरेश तळवलकरांसह दिग्गज कलाकारांचा गौरव

Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली