महाराष्ट्र

आव्हाडांचे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाला ट्वीट; तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष…

काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर कोर्टात धाव घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. हा गुन्हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

Ganesh Mate

मुंबई - आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) साजरा केला जात असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा रंगली आहे. काबाडकष्ट करत मुलांना घडवतो तो… स्वत: उपाशी राहत इतरांना भरवतो तो… हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो.. हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो… आणि गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष…, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या (BJP) महिला पदाधिकारी रिदा रशीद यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल झाला आहे. या प्रकारावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणाही केली होती.

मी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) भेटायला जात असताना समोरून आमदार जितेंद्र आव्हाड आले. स्थानिक आमदार असल्याने मी त्यांना पाहून स्मितहास्य केले. तेव्हा त्यांनी ‘तू इथे काय करतेस’ म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटले, असा आरोप रशीद यांनी केला. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा खोटा असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्यानंतर कोर्टात धाव घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. हा गुन्हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?