जालन्यातील महत्त्वाची घटना  
महाराष्ट्र

कौतुकास्पद! एस. टी. सुरक्षारक्षकाची प्रामाणिकता; साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय

एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या

दिपाली नाफडे
  • वैजापूर बसस्थानकातील घटनेने दिला संदेश
  • साडेतीन लाखाचा ऐवज केला परत 
  • एस.टी. सुरक्षकारक्षकाचा प्रामाणिकपणा 

वैजापूर-जालनाः आजच्या धावपळीच्या, गर्दीच्या आणि तितक्याच स्वकेंद्रित होत चाललेल्या जगात, 'माणुसकी' आणि 'प्रामाणिकपणा' हे शब्द केवळ पुस्तकातच उरलेत की काय? असा प्रश्न पडतो. पण याच जगात असे काही निस्वार्थ लोक आहेत, जे आपल्या साध्या पण खऱ्या कृतीतून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा ठाम विश्वास देतात. असाच एक थक्क करणारा आणि तितकाच अभिमानास्पद प्रसंग वैजापूर येथील एस.टी. बसस्थानकात घडला, जिथे एका सामान्य सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मोहावर मात करीत आपल्या अतुलनीय प्रामाणिकपणाचा परिचय दिला. एस. टी. सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांनी तब्बल साडेतीन लक्ष रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली एक बेवारस बॅग तिच्या मूळ मालकाला परत करून आदर्श निर्माण केला आहे.

२९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वैजापूर बसस्थानक परिसरात सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी गस्त घालत होते. त्यावेळी बसस्थानकातील बाकावर एक बेवारस बंग त्यांच्या नजरेस पडली, संशयास्पद वस्तू समजून त्यांनी ती बंग तात्काळ उचलून एस.टी. नियंत्रक कार्यालयात जमा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, सुमारे दोन तासांनंतर प्रवासी गणेश देविदास जानराव हे बसस्थानकात आले आणि त्यांनी आपली बेंग हरवल्याचे सांगत चौकशी सुरू केली. त्यावेळी सुरक्षा रक्षक तडवी यांच्या लक्षात आले की, तीच बॅग त्यांनी नियंत्रक कार्यालयात जमा केली होती.

सोन्याचे दागिने, महत्वाच्या वस्तू केल्या परत

तत्काळ संबंधित प्रवाशाला एस.टी. नियंत्रकांच्या कार्यालयात नेले, तेथे ओळखा पडताळणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रवासी जानराव यांनी बेंगेचे अचूक वर्णन दिल्याने ती त्यांचीच असल्याचे निश्चित झाले. या प्रामाणिक कृतीबद्दल वैजापूर एस.टी. आगाराचे प्रमुख किरण धनवटे यांनी सुरक्षारक्षक बी. आर. तडवी यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी एस. टी. चे टी. आय. भदाणे, कोकाटे, गरुड, जाधव, गंगवाल, ठाकूर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी तडवी याच्या कामगिरीचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या घटनेमुळे एस.टी. विभागातील कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही तडवी यांच्या प्रामाणिकतेबद्दल प्रशंसेचा वर्षाव होत आहे. आज ज्या काळात हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते, त्या काळात बी. आर. तडवी यांनी दाखवलेला प्रामाणिकतेचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे. एसटी आगाराच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बंग उघडण्यात आली असता, त्यात तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि अन्य काही महत्त्वाच्या वस्तू असल्याचे दिसून आले.

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या