मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ४८ उमदेवाराची पहिली यादी असून विश्वजित कदम यांना तिकीट देण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचा काल पत्रकार परिषद पार पडली होती. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत झालं होतं. काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर लगेचच कॉंग्रेसनेही ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीने ८५-८५-८५ चा फार्म्युल्यावर एकमत झाल्याचं सांगितलं होतं. मात्र काही जागांवर संभ्रम कायम होता. या फार्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांच्या मिळून २५५ जागा होतात. तर मित्रपक्षांच्या १८ जागा, अशा एकून २७३ जागांचं गणित जुळतं आहे. मात्र उर्वरीत १५ जागांचं काय? याबाबत राज्यभर तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
1. अक्कलकुवा (ST) - ॲड. के.सी. पडवी
2.शहादा (ST) - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
3. नंदुरबार (ST) - किरण दामोदर तडवी
4.नवापूर (ST) - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती - बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर SC - डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर - सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री - विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख
32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी (ST) - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड
34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे
40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील
45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले (SC) - राजू जयंतराव आवळे
47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत