Jalgaon News: (सौजन्य- सोशलमीडिया)
महाराष्ट्र

Jalgaon News: कन्नडच्या व्यावसायिकाचा खून! मृतदेह बहुळा धरणात; ८० लाखांचा बयाणा देऊनही वाद, २ ताब्यात

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शेतीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून कन्नड येथील ५२ वर्षीय व्यावसायिक डॉ. संजय मनोहर तेली यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. तेली यांचा मृतदेह २३ नोव्हेंबर रोजी बहुळा धरणात आढळला.

Riddhi Vanne
  • जमीन व्यवहारातून व्यावसायिकाचा खून

  • सहा दिवसांनंतर धरणात मृतदेह आढळला

  • दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

पाचोरा (वा.) शेतीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून कन्नड येथील ५२ वर्षीय व्यावसायिकाचा खून करून मृतदेह बहुळा धरणात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. संजय मनोहर तेली यांचा मृतदेह अखेर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास धरणात आढळला. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. डॉ. तेली हे वैद्यकीय क्षेत्रासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते.

गोराडखेडा येथील राहल धर्मराज पाटील यांच्या मालकीची दोन एकर जमीन एक कोटी दोन लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचे त्यांनी निश्चित केले होते. या व्यवहारापोटी त्यांनी राहुल पाटील यांना ८० लाख रुपये बयाणा दिला होता.

१८ नोव्हेंबरपासून बेपत्ता, व्यवहार वादाची किनार

१७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली मुलीसह चारचाकीने कन्नड येथून निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे शालकाकडून पाच लाख रुपये घेण्यासाठी गेले. त्यानंतर सांगवी प्र. लोद येथील घरी परतून तीन लाख दहा हजार रुपये ठेवले आणि उर्वरित एक लाख ९० हजार रुपये घेऊन १८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील यांच्याकडे गेले, त्यानंतर ते बेपत्ता झाले.

रॉडने हल्ला करून मृतदेह धरणात फेकला

प्राथमिक माहितीनुसार, जमीन व्यवहारावरून डॉ. तेली आणि राहुल पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. याच वादातून राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राहुलने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकल्याची कबुली दिल्याचे समजते.

माहिती देणाऱ्यास बक्षीसाची होती घोषणा

डॉ. तेली बेपत्ता झाल्यानतर नातेवाईकांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शौचासाठी एक लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांना ताब्यात घेतले. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनंतर २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातपासून धरणात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मृतदेह सापडला. पोलिस आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेला. यावेळी नातेवाइकांनी आक्रोश कैला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पाचोरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

New Rules December 2026 : 1 डिसेंबरपासून बदलणार तुमच्या खिशाचे गणित! 7 मोठे नियम लागू; Credit Card पासून गॅसपर्यंत कसा होणार परिणाम?

Mental illness: मानसिक आजार म्हणजे काय? मानसिक आजारांमध्ये कोणकोणत्या रोगांचा समावेश होतो? जाणून घ्या सविस्तर माहिती

लेखक, निर्मात्यांसाठी सुवर्णसंधी! NFDC आणि Sony Pictures ची मोठी भागीदारी; 'वेव्हज बझार'द्वारे 5 भाषांमध्ये सादर करता येणार नवीन कथा

Zee Marathi Serial Off Air? लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

Nagpur News : खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार लगाम; हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय आस्थापना विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न