महाराष्ट्र

लव्ह जिहाद प्रकरण राणांच्या अंगलट; खासदार नवनीत राणां विरोधात गुन्हा दाखल

Pooja Pawar

अमरावती : काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका १९ वर्षीय युवतीचं अपहरण झाली असल्याची बातमी समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा लव्ह जिहादचा (Love Jihad) संबंध असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde), भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला होता. मात्र परवा रात्री सदर ती तरुणी सातारा इथे सुखरूप सापडली.

दरम्यान त्या तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नाही मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे असा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला होता. आता लव्ह जिहादचा आरोप करणं खासदार नवनीत राणा यांच्या अंगलट आले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कथित लव जिहाद प्रकरणात संबधीत मुलाला धमकावल्याचा आणि बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचीही तक्रारीत नोंद झाली आहे.

काय होते नेमके प्रकरण :

खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राडा केला होता. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसंच पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत जवळपास २० मिनिटं पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. राणा दाम्पत्याने पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते.

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स