धक्कादायक ! आश्रमशाळेच्या जेवणातील वरणात आढळली पाल; 31 विद्यार्थ्यांना झाली विषबाधा (File Photo : Food Poison) 
महाराष्ट्र

Kolhapur News : शिवनाकवाडी विषबाधेतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषबाधेचे कारण शोधण्यासाठी यंत्रणांकडून तपास

आरगे यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून, विषबाधेच्या प्रकरणानंतर पहिल्या ग्रामस्थाच्या मृत्यूने गावात भीतीचे वातावरण पसरले असून, या विषबाधेचे कारण शोधण्यासाठी संबंधित आरोग्य विभागाने तपास सुरू केला आहे.

कृपादान आवळे

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) माता कल्याणताई देवीच्या यात्रेदरम्यान अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर यामधील अखेर एकाचा मृत्यू झाला. शिवनाकवाडी येथील बाळासाहेब सदू आरगे (वय ६२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते विषबाधित झाले होते. मात्र, त्यांना इतर व्याधींचा त्रास असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी सांगितले.

दरम्यान ते विष बाधित होऊन त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याने विषबाधेचा पहिला बळी गेल्याची तालुक्यात चर्चा आहे. शिवनाकवाडी येथे अन्नपदार्थातून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांची प्रकृती बिघडली होती. 27 रुग्ण आयजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी बाळासो आरगे हे देखील विषबाधित झाले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार आयजीएम रुग्णालयात करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांच्या दरम्यान त्यांची स्थिती अधिक गंभीर झाली आणि त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आरगे यांना थायरॉईडसह मधुमेह आदीबाबत औषधे सुरू होती. त्यांना निमोनियाची लागण झाली होती. त्यांच्या किडनीवरही उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. विषबाधेच्या घटनेनंतर आरोग्य विभाग, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या टीमने परिस्थिती आटोक्यात आणली आहे. आरगे यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून, विषबाधेच्या प्रकरणानंतर पहिल्या ग्रामस्थाच्या मृत्यूने गावात भीतीचे वातावरण पसरले असून, या विषबाधेचे कारण शोधण्यासाठी संबंधित आरोग्य विभागाने तपास सुरू केला आहे.

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स