Palghar Gys Leak (Photo Credit- X) 
पालघर

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर

गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली.

नितिन कुऱ्हे

Palghar Gas Leak: पालघरमधील तारापूर-बोईसर औद्योगिक क्षेत्रातील एका औषध कंपनीत गुरुवारी (21 ऑगस्ट) दुपारी गॅस गळती झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली. या गळतीमुळे एकूण सहा कामगार बाधित झाले. त्यांना तातडीने शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, यातील चौघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. तर साक्षीदारांचे जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे पालघर पोलिसांनी सांगितले आहे.

मृत आणि जखमींची नावे

या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव यांचा समावेश आहे. तर, रोहन शिंदे आणि निलेश हाडळ यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, वायु गळतीचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे मत

पालघर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, "दुपारी सुमारे 2:30 ते 3 च्या दरम्यान कंपनीतील नायट्रोजन गॅसची गळती झाली. यामुळे तेथे काम करणारे कामगार प्रभावित झाले. सहा कामगारांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सायंकाळी 6:15 च्या सुमारास चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर स्थानिक रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू आहेत. सर्व बाधित कामगारांना कारखान्यातून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे."

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक