सोलापूर जिल्ह्यात सर्व न्यायालयामध्ये दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरमधील सर्व न्यायालयामध्ये सन 2025 मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत दि.10 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 27 हजार 320 इतकी प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
सोलापूरमधील या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामधील तडजोडी मुल्य 1,49,18,63,016 (एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ट हजार सोळा) इतके राहिले. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकुण 31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुर्नस्थापित झाले. सन 2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले आणि मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीतध्ये संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश आर.जे.कटारिया, जिल्हा न्यायाधीश वाय.ए.राणे, जिल्हा न्यायाधीश जे.जे.मोहिते,तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस.व्ही.केंद्रे, जिल्हा सहकारी वकिल प्रदिपसिंग रजपूत, सोलापूर वकिल संघाचे अध्यक्ष व्ही.पी.शिंदे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधिर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे, तसेच इत्तर न्यायधीश विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून एकुण 4 हजार 916 प्रलंबित प्रकरणे दाखल केली व 22 हजार 404 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणामधील तडजोड मुल्य 1,49,18,63,016 (एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ठ हजार सोळा ) इतके राहिले. सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयांमध्ये 15 वर्षे जुनी 01, 10 वर्षे जुनी 11, 5 वर्षे जुनी 951 अशी एकुण 963 जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापुर्वी दिनांक 5 मे 2025 ते 9 मे 2025 या कालावधीमध्ये मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये 15 वर्षे जुनी 9, 10 वर्षे जुनी 46, 5 वर्षे जुनी 527 अशी एकुण 4 हजार 82 इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली.
राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथे भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मालवणमधील राजकोट येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये पुतळा पूर्णपणे कोसळला होता. यानंतर राज्य सरकारकडून पूर्ण काळजी घेऊन आणि अनुभवी शिल्पकारांच्या मदतीने नवीन पुतळा उभारण्यात आला. कोकणातील या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी हा पुतळा शिल्पकार राम सुतार यांनी अतिशय सुंदर पुतळा बनवला आहे. कितीही जोरदार वारा किंवा वादळ आले तरी पुतळा उभा राहील. हा पुतळा सुमारे ९१ फूट उंच आहे. त्याचा पाया १० फूट उंच आहे. तसेच हा महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा आहे," अशी माहिती दिली.