“वाल्मिक कराड घरगडी होता अन् त्याचा मालक…”; सुरेश धस यांचा पुन्हा खबळजनक दावा 
महाराष्ट्र

Suresh Dhas : “वाल्मिक कराड घरगडी होता अन् त्याचा मालक…”; सुरेश धस यांचा पुन्हा खबळजनक दावा

“वाल्मिक कराड आधी फक्त घरगडी होता. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी साफसफाईचं काम करायचा. असा खळबळजन दावा पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

संदीप गावडे

“वाल्मिक कराड आधी फक्त घरगडी होता. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी साफसफाईचं काम करायचा. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या आणि टीपी मुंडेंच्या महाविद्यालयाच्या राजकारणात गोळीबार झाला. त्यावेळी एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली. नशिबाने तो वाचला. त्याच्यानंतर वाल्मिक कराड थेट गोपीनाथ मुंडेंच्या रातच गेला. आमच्यासाठी गोळी खाल्ली म्हणून वाल्मिकचे कौतुक झालं. तो साहेबांच्या जवळ गेला. गोपीनाथराव आणि पंडित अण्णा एकत्र होते. नंतर ते वेगळे झाले. हे दोघे वेगळे झाल्यानंतर वाल्मिक पंडितांनांकडे वळला”, असा खळबळजन दावा पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच सूत्रधार असलेला वाल्मिक कराडही तुरुंगात आहे. वाल्मिक कराडवरून सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत, रोज नवे खुलासे करत आहेत. दरम्यान वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोमवारी व्हायरल झाले. मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. दरम्यान मंगळवारी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी आता वाल्मिक कराडबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. वाल्मिक कराड घरगडी होता आणि त्याला मालक करण्यात आलं असं आता सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

गोपीनाथराव आणि पंडित अण्णा मुंडे हे तसे कधी वेगळे नव्हते. भावा भावांचं प्रचंड एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. त्यांचं विभाजन झालं त्यावेळी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला. जो सुरुवातीला घरगडी होता. त्यालाच तुम्ही मालक करून टाकलंत. एवढा मोठा मालक केला की सगळंच त्याच्यावर सोपवलं .जर एखाद्याची लायकी १०० रुपयांची असेल आणि त्याला दहा लाख रुपये दिल्यावर तो काय करणार? खाणार आणि दहा लाखांचे एक कोटी करण्याचा प्रयत्न करणार. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही ग्रिडी पॉलिटिक्स केलं. सुरेश धस यांनी हा दावा केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला आहे.

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या