सिनेमा

किंग खानला वाढदिवसाला शुभेच्छा देणं चाहत्यांना पडलं महागात, 'मन्नत' बाहेरुन 34 मोबाईल फोन चोरीला!

शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर (Mannat) तुफान गर्दी केली होती. या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.

Pravina Shirpurkar

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) गुरुवारी त्याच्या  58 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या आवडत्या अभिनेत्याल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मन्नत बाहेर नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. मात्र, शाहरुखला शुभेच्छा देणं काही चाहत्यांना चांगलच महागात पडलं आहे. मन्नत'बाहेर (Mannat) झालेल्या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.

मन्नतबाहेर चाहत्यांनी केली एकच गर्दी

मुंंबईतील वांद्रे परिसरात अभिनेता शाहरुख खानंच घर मन्नत आहे. त्याच्या घराबाहेर 365 दिवस चाहत्यांची गर्दी असते. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहते त्याच्या घरासमोर तासनतास उभे राहतात. 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस होता. आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फॅन्सनी एकच गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत काही फॅन्सचे मोबाईल फोन चोरीला गेले. या प्रकरणी चाहत्यांनी मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड या ठिकाणांहून लोक एसआरकेला (SRK) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू