I Want to Talk मधली अभिषेक बच्चनने भूमिका का स्वीकारली ? आराध्याचं नाव सांगत म्हणाला... 
सिनेमा

I Want to Talk मधली अभिषेक बच्चनने भूमिका का स्वीकारली ? आराध्याचं नाव सांगत म्हणाला...

अभिषेक बच्चन सध्या शुजित सरकार दिग्दर्शित  ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये अभिषेकने त्याची लेक आराध्याबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

चेतन बोडके

अभिषेक बच्चन सध्या शुजित सरकार दिग्दर्शित  ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिवाय, त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता बराच व्यस्त आहे. अभिषेक बच्चनने नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये अभिषेकने त्याची लेक आराध्याबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना अभिषेकने लेक आराध्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट एकट्या बापाच्या भावनिक प्रवासावर भाष्य करतो. जो आपल्या मुलीसोबत राहत असताना त्याच्या आणि मुलीच्या नात्यात अडचणी येतात. अभिषेक म्हणतो की "मी चित्रपटातील पात्रासोबत स्वत:ला काही वचनांसोबत जोडतो. अर्जुन सेन त्याच्या मुलीला वचन देतो की, तो नेहमी तिच्यासोबत असेल." दरम्यान, अभिषेक आपल्या मुलीचे नाव घेत म्हणतो, "आराध्या माझी मुलगी आहे आणि शूजित दा यांनाही दोन मुली आहेत. आपण सर्व 'गर्ल डॅड' आहोत. त्यामुळे लेक आणि वडिलांची भावना आम्ही चांगल्या प्रकारे समजतो.

अभिषेक बच्चनने चित्रपट निवडण्यापाठीमागील कारण सांगितलं आहे, “एक दिवस मला दिग्दर्शकांनी मला कॉल केला होता. ते मला म्हणाले की, माझ्याकडे एका चित्रपटाची स्क्रिप्ट आहे. तुम्हाला तो चित्रपट नक्की आवडेल, जर आवडला तर आपण त्यावर एकत्र काम करू. त्यांनी मला थोडक्यात कथा सांगितली. मला फक्त वडिलांच्या (अर्जुन सेनच्या) पात्राबद्दल सांगितले. मला अशा एका माणसावर चित्रपट बनवायचा आहे, ज्याला डॉक्टरांनी सांगितलेय की, त्याच्याकडे फक्त १०० दिवस आहेत. सहसा अशा परिस्थितीत लोक नैराश्यात जातात; परंतु हा माणूस इतका उत्साही होता की, त्याने ते अत्यंत सकारात्मकतेने घेतले. आज मी काय साध्य करणार, या विचाराने तो रोज उठायचा. त्यामुळे मला ती कथा आवडली.”

बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या हिना खानच्या धाडसाचे सलमानने केले कौतुक, म्हणाला, “आत्मविश्वास असलेली स्त्री…”

पुढे अभिनेत्याने म्हटले, “चित्रपटाचे कथानक आवडण्याबरोबरच मला आणखी एक गोष्ट आवडली की, ही कथा एका वडिलांच्या दृष्टिकोनातूनही सांगितली जाणार आहे. एक बाप सांगतो की, मी सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून मुलीसाठी जगणार आहे. ही गोष्ट खूप प्रेरणादायी होती.”

पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडला थरार, एक जखमी

Astro Tips: गोड खाल्ल्यानंतर लगेच घराबाहेर का पडू नये? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारण

Student Death: OYO हॉटेलच्या खोलीत विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह! नाका-तोंडातून येत होता फेस अन्...

India Launches Blenrep : रक्त कर्करोग उपचारात मोठी प्रगती! GSK कडून 'Blenrep' लाँच; मल्टिपल मायलोमा रुग्णांना मिळणार नवा पर्याय

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर! १२,१०८ सूक्ष्म व लघु उद्योगांतून केवळ ७१ हजार जणांना रोजगार