(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)  
बॉलीवूड

बॉक्स ऑफिसवर 'Coolie' चित्रपट 'War 2' वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

हृतिक रोशन आणि रजनीकांत या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट बोझ ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कमाईच्या बाबतीत, या दोन्ही चित्रपटांनी सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या दोन्ही चित्रपटांची आतापर्यंत एकूण कमाई जाणून घेऊ.

सायली ससाणे
  • 'Coolie' चित्रपट 'War 2' चित्रपटाचे एकूण कलेक्शन
  • 'Coolie' चित्रपटाने केली जास्त कमाई?
  • 'War 2' ची कमाई 'Coolie' चित्रपटापेक्षा कमी?

हृतिक रोशन आणि रजनीकांत यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. कमाईच्या बाबतीत दोन्ही चित्रपटांनी मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चाहते सोशल मीडियावर स्टारकास्टचे कौतुकही करत आहेत. तसेच, रजनीकांतच्या 'कुली'चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशनच्या 'वॉर २' चित्रपटाला मागे टाकले आहे. तिसऱ्या दिवशीच या चित्रपटांने 'सैयारा' चित्रपटालाही मागे टाकले आहे. 'कुली' चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे. तसेच या चित्रपटाचे आतापर्यंतचे ऐकून कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत.

'कुली' चित्रपटाचे एकूण कलेक्शन?

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांतच्या 'कुली' ने तिसऱ्या दिवशी ३८.५० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाची तमिळ भाषेत ऑक्यूपेंसी ६५.९९% होती. तर सकाळचा शो ४६.५१%, दुपारचा शो ६६.८४%, संध्याकाळचा शो ७०.९०% आणि रात्रीचा शो ७९.७१% होता. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत १५८.२५ कोटींची कमाई केली आहे. ७४ वर्षांच्या वयातही रजनीकांतची रेकॉर्डब्रेक ओपनिंग पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहे. चित्रपटामधील रजनीकांत यांची ॲक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

'वॉर २' चे एकूण कलेक्शन ?

दुसरीकडे, जर आपण आकडेवारी पाहिली तर, हृतिक रोशनचा 'वॉर २' रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा मागे पडला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३३ कोटींची कमाई केली आहे. त्याची हिंदी ऑक्यूपेंसी ३१.४२% होती. सकाळचे शो १६.२७%, दुपारचे शो ३४.६०%, संध्याकाळचे शो ३८.८१% आणि रात्रीचे शो ३५.९९% होते. चित्रपटाने आतापर्यंत १४२.३५ कोटींची कमाई केली आहे. 'वॉर २' चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडत आहे. परंतु, या चित्रपटाला हवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही आहे.

दोन्ही चित्रपटांमधील कलाकार

प्रेक्षक दोन्ही चित्रपटांची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. रजनीकांत यांना बऱ्याच काळानंतर पडद्यावर पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटामध्ये श्रुती हासन, नागार्जुन अक्किनेनी आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच, हृतिक रोशनच्या 'वॉर २' मध्ये हृतिकसोबत कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत काम करताना दिसले आहेत.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक