(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी पहाटे ५:३० वाजता गुरुग्राममधील प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. युट्यूबरच्या घरी अनेक वेळा गोळीबार करण्यात आल्याचे समजले आहे. तसेच युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार का करण्यात आले आहे? आणि हे सगळं कोणी केले आहे? हे अद्यापही समजलेले नाही आहे.
फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
ही घटना कधी घडली?
आज, रविवारी, पहाटे ५ वाजता, गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला. ही घटना घडली जेव्हा युट्यूबर घरी नव्हता. तसेच, त्याची आई घरीच होती. पोलिसांनी सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी सुमारे १२ राउंड फायरिंग केली. तसेच, गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, जवळील सीसीटीव्ही स्कॅन केले जात आहेत आणि तपास देखील सुरू आहे. तसेच युट्यूबर एल्विश यादवच्या वडिलांनी देखील याबद्दल माहिती दिली आहे.
🚨SHOCKING. Dozens of rounds FIRED at Elvish Yadav’s house in Gurugram Sec-56 at 6 AM
~ 3 shooters carried out the attackCelebrating Hindu fests to fearlessly EXPOSING anti-Hindu ecosystem, Elvish has earned both Love & ENEMIES. Prayers for his safety🙏 pic.twitter.com/Jc2ZGhYJRh
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) August 17, 2025
युट्यूबरच्या वडिलांनी सांगितले – ‘२५-३० गोळ्या झाडल्या’
गोळीबाराच्या घटनेनंतर, एल्विश यादवचे वडील राम अवतार यादव यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की ही घटना पहाटे ५:३०-६ च्या सुमारास घडली आणि त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. ते म्हणाले, ‘सुमारे २५-३० गोळ्या झाडल्या गेल्या असाव्यात.’ यासोबतच, युट्यूबरच्या वडिलांनी सांगितले की घटनेच्या वेळी एल्विश घरी नव्हता. ते पुढे म्हणाले, ‘सीसीटीव्ही फुटेजमध्ये, आमच्या घराबाहेर तीन लोक दिसत होते. एक जण त्याची बाईक घेऊन समोर उभा होता, तर दोन लोक आमच्या गेटबाहेर गोळ्या झाडत होते.’ तसेच, एल्विशने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
क्राईम टीम घटनास्थळी पोहचली
गुन्हा केल्यानंतर काही मिनिटांतच दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेले. क्राईम टीम घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिस प्रत्येक कोनातून घटनेचा तपास करत आहेत. पहाटे घडलेल्या या घटनेत गोळ्या लागल्याने लोकही हादरले होते. पोलिस सीसीटीव्ही फुटेज वापरून दुचाकीस्वारांची ओळख पटवत आहेत. गुन्हेगारांनी पहिल्या मजल्यावर आणि तळमजल्यावर गोळ्या झाडल्या आहेत. वृत्तानुसार, युट्यूबर तिसऱ्या मजल्यावर राहत आहे.