(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम) 
बॉलीवूड

प्रभू देवा आणि सनी लिओनीचा ‘पेट्टा रॅप’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निर्मात्यांनी शेअर केले पोस्टर!

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि डाँसिन्ग स्टार प्रभू देवा हे दोघेही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. या दोघांचाही 'पेट्टा रॅप' हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ज्याची आतुरता चाहत्यांना अनेक दिवसांपासून होती. तसेच प्रेक्षकांना आता हा चित्रपट चित्रपटगृहात बघता येणार असून, त्यांना प्रभू देवा आणि सनी लिओनीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

सायली ससाणे

सनी लिओनी तिच्या पुढच्या तमिळ चित्रपट 'पेट्टा रॅप' साठी सज्ज झाली असून या मध्ये ती प्रसिद्ध कोरिओग्राफर चित्रपट निर्माता आणि अभिनेता प्रभु देवासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ज्यात प्रभू देवा आणि वेदिका यांच्यासोबत सनी आहे. परफेक्ट मास एंटरटेनर होण्याचे आश्वासन देणारा हा चित्रपट 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

पोस्टरमध्ये सनी तिच्या ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. याआधी ही अभिनेत्री प्रभू देवासोबत एका गाण्यात नाचणार असल्याचे समोर आले होते आणि ही बातमी आल्यापासून तिचे चाहते गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी सनीने तामिळ चित्रपट 'कोटेशन गँग' मधील तिच्या लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते, ज्यामध्ये तिने एका मारेकरीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले. तसेच आता ती या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'पेट्टा रॅप' आणि 'कोटेशन गँग' व्यतिरिक्त सनी प्रभुदेवा आणि हिमेश रेशमियाच्या 'बॅडस रविकुमार'मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे 'शेरो' आणि शीर्षक नसलेला मल्याळम चित्रपट देखील आहे. चित्रपटांच्या पलीकडे, अभिनेत्री तिच्या कॉस्मेटिक ब्रँडसह उद्योजकीय जगात कहर करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अभिनेत्रींचे सर्व क्षेत्रात असलेले उत्कृष्ट कौशल्य पाहून चाहत्यांना तिचा जास्त अभिमान आणि आनंद वाटत आहे.

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुकाराम मुंढेंचा FDA च्या सहाय्यक आयुक्तालाच दणका; निष्काळजीपणामुळे थेट निलंबितच केलं

Delimitation Bill : फेररचनेनंतर लोकसभेतील सदस्यसंख्या 273 ने वाढणार; एकूण संख्या 543 वरून 816 वर जाणार

Gajakesari Raja Yoga: ३० नोव्हेंबरला तयार होणार गजकेसरी योग, सिंह आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा