(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम) 
बॉलीवूड

राधिका मर्चंटने अनंत अंबानींचा वाढदिवस खास करण्यासाठी कोणतीही सोडली नाही कसर; सरप्राइज एन्ट्री व्हिडिओने जिंकली मनं

अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील सर्वात खास क्षण समोर आला आहे आणि तो खास बनवण्यात त्याच्या पत्नी राधिकाचा मोलाचा वाटा आहे. या खास क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सायली ससाणे
  • राधिका मर्चंटने अनंत अंबानीला दिले सरप्राईज
  • सरप्राइज एन्ट्री व्हिडिओने जिंकली मनं
  • वाढदिवसाला कलाकारांनीही लावली हजेरी

अनंत अंबानीने अलीकडेच जामनगर येथे आपला ३१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात त्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते, तसेच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. दोन दिवस चाललेल्या या भव्य सेलिब्रेशनची सुरुवात सूफी नाईटने झाली, तर दुसऱ्या दिवशी विविध सामाजिक उपक्रमांसह ग्रँड पार्टी पार पडली. या कार्यक्रमातील एक खास रोमँटिक क्षण सध्या चर्चेत असून, त्यातून राधिका मर्चंट आणि अनंत यांच्यातील घट्ट नातं आणि प्रेम स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय की, राधिकाने अनंतचा वाढदिवस खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

एका फॅन पेजवर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीसाठी एक खास सरप्राइज प्लॅन केला होता. संपूर्ण ठिकाण फुलांनी सजवण्यात आले होते आणि एन्ट्रीवरही फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. अनंत आत येताच त्याच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करण्यात आला. समोर उभ्या असलेल्या राधिकाने त्याला प्रेमाने मिठी मारली. हा खास क्षण अनंतसाठी अत्यंत सुंदर भेट ठरला. हा रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षकांकडून तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते एकच म्हणत आहेत, दोघांमधील प्रेम खरोखरच मनापासून आणि खास आहे.

राधिकाने व्यक्त केला आनंद

अनंत अंबानीच्या स्टाफनेही त्याची पत्नी राधिका मर्चंसोबत मिळून हे ग्रँड सेलिब्रेशन खास बनवले. या संपूर्ण सरप्राइझच्या मागे राधिकाचे क्षेय आहे, याची अनंतला कल्पनाच नव्हती. तो एन्ट्री करताच समोर राधिका उभी असल्याचे पाहून त्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. उत्साहात त्याने राधिकाला हाक मारली, तर राधिकाही तितक्याच उत्साही दिसत होती. आणखी एका व्हिडिओमध्ये दोघेही मनमोकळेपणाने हसताना दिसत आहेत.

वाढदिवसाला कलाकारांनीही लावली हजेरी

या व्हिडिओमध्ये, अनंत अंबानीने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती, तर राधिकाने साधा केशरी रंगाचा सूट परिधान केला होता. पार्श्वभूमीत सिंह आणि हत्तीची सजावटही दिसत आहे. पार्टीबद्दल बोलायचे झाल्यास, शाहरुख खान, रणवीर सिंग, अनन्या पांडे, ओहरी, सलमान खान, संजय दत्त, क्रिती सॅनॉन, अगस्त्य नंदा, दिया मिर्झा आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या शानदार संध्याकाळचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे वेगाने व्हायरल होत असून, चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Vijay Merchant Trophy : डीडीसीएने मुंबईविरुद्ध विजय मर्चंट ट्रॉफीविरुद्धच्या सामन्यासाठी जाहीर केला संघ

Best Business Ideas : नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त फायदा? 5 लाखांत सुरू करा हे व्यवसाय; दरमहा सहज मिळतील 50 हजार रुपये

Avocado Toast Recipe: चविष्ट नाश्त्यासोबत मिळतील आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Dubai Viral Video: केरळ पिरवीनिमित्त साडी नेसून सायकलिंग! दुबईच्या रस्त्यांवर भारतीय महिलेचा अनोखा अंदाज

Thane Taxi Strike: ठाणेकरांनो लक्ष द्या! रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारला अल्टिमेटम; ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा १ डिसेंबरला बंद