सिनेमा

Asha Bhosale : 'गाणं खरेपणाने गा...फक्त सुंदर गाऊ नका', आशा भोसलेंच्या 'जैत रे जैत' च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा 'तो' किस्सा

आशाबाईंच्या गाण्यांची प्लेलीस्ट खूप मोठी आहे. पण आशा भोसले यांच्या संगीतातील कारकिर्दीबाबत बोलायचं झालंच तर हा या एका सिनेमाचा उल्लेख व्हायलाच पाहिजे तो सिनेमा म्हणजे जैत रे जैत.

तृप्ती गायकवाड
  • जैत रे जैत' च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा 'तो' किस्सा
  • गाणं खरेपणाने गा , असं का म्हणाले हृदयनाथ मंगेशकर ?

ज्यांच्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करते, असं संगीतातील नामवंत घराणं म्हणजे मंगेशकर कुटुंबीय. चार बहिणी आणि एक भाऊ म्हणजे संगीतसृष्टीतील पाच पांडव. असं म्हणतात की लताबाई मंगेशकरांच्या आवाजाने रात्रीची शांत झोप लागते तर आशा भोसलेंच्या ठसकेबाज आवाजाने चैतन्य संचारतं. पाठीला पाठ लावून आलेल्या या बहिणी गाण्यात कोणाचाही हात धरु शकत नाहीत. आशाबाईंची खासियत म्हणजे ज्या ठसक्यात त्या लावणी गायच्या त्याचप्रमाणे त्या जीव ओतून भावगीत देखील गायच्या. मराठी, हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉ़लीवूड देखील आशा भोसले यांनी सगळीकडे आपली छाप सोडली. आशाबाईंच्या गाण्यांची प्लेलीस्ट खूप मोठी आहे. पण आशा भोसले यांच्या संगीतातील कारकिर्दीबाबत बोलायचं झालंच तर हा या एका सिनेमाचा उल्लेख व्हायलाच पाहिजे तो सिनेमा म्हणजे जैत रे जैत.

जैत रे जैत सिनेमा आणि आशा भोसले हे एकेकाळी एक संगीतसृष्टीतलं समीकरण झालं होतं. स्मिता पाटील यांच्या अभिनयाने अजरामर झाालेल्या या सिनेमातील गाण्यांनी चार चाँद लावले. तुम्हाला माहितेय का या सिनेमाच्या रेकॉर्डींग वेळी एक किस्सा घडला होता.

सिनेमातल्या सगळ्याच गाण्याचं संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिलं. मी रात टाकली या गाण्याचं रेकॉर्डींग होतं त्यावेळी एक किस्सा घडला होता. या गाण्यात एकाकीपणा, वेदना आणि जंगलातील शांतता ऐकू यायला हवी होती. पण स्टुडिओमध्ये गाणं गाताना तो फील येत नव्हता. काही केल्या हृदयनाथ मंगेशकरांना पाहिजे तसं गाणं होत नव्हतं. मग त्यांना एक वेगळी कल्पना सुचली. रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओतील लाईट्स कमी करण्यात आले, वातावरण शांत केलं आणि आशा ताईंना सांगितलं की, “तुम्ही स्वतःला एकटं समजा… जसं काही अंधारात बसून गात आहात. आणि मंगेशकरांनी गाण्यात जे हवं ते आशाबाईंच्या गळ्यातून उतरलं. मी रात टाकली म्हणणारी चिंगी समाजाच्या रुढी परंपरांविरोधात बंड पुकारणारी आदिवासी स्त्री.

तिला साजेसा असा रांगडेपणी पण त्यातही दु:ख, वेदना आणि समाजाबाबचा राग व्यक्त होतं अपेक्षित होतं ते शिवधनुष्य आशाबाईंनी चोख पार पाडलं. मंगेशकर आशाबाईंना कायम सांगत असे  गाणं सुंदर गाऊ नका… खरं गा. आणि आशाबाईंनी संगीतकार म्हणून मंगेशकरांचं ऐकलं देखील. जैत रे जैत सिनेमा जसा मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने अजरामर झाला त्याच तोडीसतोड ना.धो. महानोरांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि आशा भोसलेंचा जादुई आवाज याला देखील सिनेमाच्या यशाचं श्रेय जातं. आज आशा भोसले हे जग सोडून गेल्या तरी त्य़ांची गाणी काय़मच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहेत.

MSRTC: एसटी महामंडळाचा विद्यार्थ्यांसाठी नवा प्लॅन! आता शाळा-महाविद्यालयांच्या बस धावणार विनावाहक

AI Smart Glasses म्हणजे काय? चष्म्यातून कॉल, फोटो आणि AI ची मदत?

महिंद्राची नवी BE 07 इलेक्ट्रिक SUV पुढील वर्षी होणार लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स आणि महत्त्वाची माहिती

MSRTC Electric Bus Project: इलेक्ट्रिक बसमुळे एसटी आर्थिक संकटात; प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्या, अन्यथा प्रकल्प बंद करा!

पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांना गती; स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्रस्तावांवर शिक्कामोर्तब