(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)  
मराठी सिनेमा

महाराष्ट्राने केलं आपल्या लाडक्या रितेश भाऊचं तुफानी स्वागत! अवघ्या १२ तासांत मिळवले 2.4 Million Views

बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे. हा प्रोमो रिलीज होताच अवघ्या १२ तासांत त्याला 2.4 Million व्ह्यूज मिळवले आहेत. तसेच हा शो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सायली ससाणे
  • महाराष्ट्राने केलं रितेश भाऊचं तुफानी स्वागत
  • सर्वत्र 'बिग बॉस'च्या प्रोमोची चर्चा
  • अवघ्या १२ तासांत मिळवले 2.4 Million Views

ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत, अखेर त्याची प्रतीक्षा संपली अजून महाराष्ट्राचा लाडका भाऊ आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे.

'बिग बॉस मराठी ६ चा बिगुल वाजलाय… आणि महाराष्ट्र सज्ज झालाय आपल्या लाडक्या भाऊसोबत पुन्हा एकदा या प्रवासात सहभागी होण्यासाठी. बिग बॉस मराठी सिझन ६ सुरू होतोय ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर.' असे लिहून निर्मात्यांनी हा प्रोमो शेअर केला. आणि चाहते आता हा नवा सिझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. या नव्या सिझनची थिम काय आहे? यामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार? हे सगळं लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.

पारंपरिक वेशभूषेत आणि दमदार स्वॅगमध्ये दिसणारा रितेश देशमुख म्हणजे केवळ शोचा होस्ट नाही, तर तो महाराष्ट्राचा ‘आपला भाऊ’ आहे, हे या प्रोमोने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणुकीतून होणारी त्यांची एन्ट्री, हजारो लोकांचा जल्लोष आणि आजीच्या मिठीतला हळवा क्षण… प्रत्येक फ्रेममधून आपुलकी, संस्कृती आणि महाराष्ट्रप्रेम ओसंडून वाहत आहे. त्यामुळेच हा प्रोमो पाहणाऱ्यांसाठी फक्त एक घोषणा न राहता एक भावनिक अनुभव ठरत आहे.

“मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!” या कडक संवादाने प्रेक्षकांची धडधड आणखी वाढवली आहे. यंदा स्वॅग तोच असणार असला, तरी पॅटर्न मात्र भाऊचा असणार. घरात कोण येणार, कोणाची परीक्षा होणार, कोणाचं नशीब फळाला येणार हे सगळं अजून गुपित असलं, तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे. महाराष्ट्रात सध्या एकच विषय, एकच उत्सुकता बिग बॉस मराठी सिझन ६ ची चर्चा होत आहे. या प्रोमोसोबतच बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची अधिकृतपणे घोषणा झाली असून, प्रेक्षक सज्ज झाले आहेत एका नव्या, उत्साही आणि भावनिक प्रवासासाठी.

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

Nagpur News : सीताबर्डी उड्डाणपूल बंद होताच नागपूरची वाहतूक कोलमडली; पर्यायी मार्गांअभावी नागरिक तासनतास कोंडीत

ST Cooperative Bank Scam : एसटी बँकेतील कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन!

Rajsthan Zilla Parishad Election: ब्यावर जिल्हा परिषदेचे धक्कादायक निकाल! बहुमत असूनही कसा झाला भाजपचा पराभव?