फोटो सौजन्य - Social Media 
सिनेमा

मायरा वायकुळ चमकणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटात; बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च

मायरा वायकुळ लवकरच ,मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटात तिने अभिनय केला आहे. तसेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.

दिवेश चव्हाण

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.

ए सी डी कैटचे मनीष कुमार जायसवाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली असून या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केले आहे. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.

अल्पावधीतच जगभरात पोहचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. तिच्या अभिनयाने आणि कार्याने तिने जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. मायरा वायकुळच्या अभिनयाने चित्रपटाच्या कथेला एक वेगळा आणि भावनिक आयाम दिला आहे. या चित्रपटात तिच्या सह अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. हे सर्व कलाकार आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एक खूप प्रभावी आणि खास रंग देत आहेत.

चित्रपटाच्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'पोस्टकार्ड'च्या प्रमोशनचा आणि चित्रपटाशी नक्की काय संबंध आहे, हे देखील एका विशिष्ट प्रकारे महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर चाललेलं पोस्टकार्ड प्रमोशन चित्रपटाच्या कथा आणि संदर्भांशी गहन संबंध ठेवत आहे, ज्यामुळे त्याचं आकर्षण प्रेक्षकांना आणखी वाढतं आहे. पण तरीही, चित्रपटाची संपूर्ण कथा आणि मायरा वायकुळची भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या दिवशी चित्रपटाचे पूर्ण स्वरूप आणि त्यातील सर्व मुख्य घटनांचा अनुभव प्रेक्षकांना मिळेल.

कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर

पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुकाराम मुंढेंचा FDA च्या सहाय्यक आयुक्तालाच दणका; निष्काळजीपणामुळे थेट निलंबितच केलं