सिनेमा

महाराजांच्या काळातील स्पाय आणि गुप्तचर यंत्रणेचं शौर्य म्हणजेच ‘शेर शिवराज’

Aparna Kad

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या (Digpal Lanjekar) शिवअष्टक चित्रपटातील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज स्वारी अफजलखान’ (Sher Shivjraj Swari Afzalkhan) आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पावनखिंड’च्या अभूतपूर्व यशानंतर आता शेर शिवराजमधून अफजलखानाची दख्खनवारी आणि त्याचा शिताफीने केलेला वध ही घटना या चित्रपटात आहे. यावेळेसही अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) महाराजांची भूमिका साकारताना दिसत आहे. तर अफजल खानाच्या भूमिकेचंही विशेष आकर्षण वाढलं आहे. बॉलिवूड अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) ही भूमिका साकारत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य अफजल खानाचा कोथळा काढून वध केला होता. हा इतिहास आपण अनेकदा वाचलेला आहेच. पण ही मोहीम फत्ते करण्यासाठी महाराजांनी आपल्या मावळ्यांनांही योग्यरितीने कामाला लावलं होतं. मोठ्या कूटनीतीचा यात उपयोग करण्यात आला होता. चित्रपटाची सुरूवात ही महारांजांच्या बालवयापासून होते. जिजाऊ आपल्या लेकाला म्हणजे शिवाजी राजांना स्वराज्याच्या स्थापनेची प्रेरणा देत असतात. तर दुसरीकडे विजापूरमध्ये बडी बेगम आणि अलि आदीलशाही शिवाजी महारांजाच्या वाढत्या प्रभावामुळे त्रस्त झालेले दिसतात. याचवेळी शहाजीराजे तिथे सरदाराच्या भूमिकेत दिसतात. बडीबेगम शहाजीराजांना आपल्या मुलाला आवर घालण्यास सांगते, तर शिवाजीराजांना पकडून घेऊन येण्याचा आदेश देते. अफजलखान हा विडा उचलतो आणि दख्खनेकडे कूच करतो.

ही कहानी जरी सगळ्यांनाच माहीत असली तरीही चित्रटात अगदी रंजकपद्धतीने दर्शवण्यात आली आहे. अफजलखानाला रोखण्यासाठी महाराजांनी आपली लढाऊ ताकद आणि संख्या लक्षात घेता चातुर्याने त्याचा सामना करायचं ठरवलं होतं. महाराजांची त्या काळातली गुप्तचर यंत्रणा किती सजग होती याचा उत्तम अनुभव चित्रपटात येतो. या मोहीमेतील महत्त्वाचे सरदार आणि महाराज यांच्याभोवती हा चित्रपट फिरताना दिसतो. यात बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, दिपाईआऊ बांदल, गोपीनाथ बोकील, येसाजी कंक अशा अनेक महत्त्वाच्या सरदारांचा समावेश आहे. याशिवाय चित्रपटात आयुर्वेद आणि शस्त्रशास्त्र अशा ग्रंथाचा उपयोग महाराजांनी कसा केला याचंही वर्णन पाहायला मिळतं.

अफजलखानाच्या भेटीवेळी खानाच्या दगाबाजीचा अंदाज घेत महाराजांनी एक खास चिलखत बनवून घेतलं होतं. तर स्वतः शस्त्रांचा अभ्यास करून एक शस्त्र तयार करण्यास सांगितलं होतं. आणि ते म्हणजे वाघनखे. अशा अनेक लहान लहान घटनांचं सखोल वर्णनही चित्रपटात आहे.

अभिनय 

सर्वच कलाकारांनी अभिनयावर खूपच चांगलं काम केलं आहे. चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय चांगल्यारित्या साकारली आहे. जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहेत. मुकेश ऋषींनी अफजल खानाचं पात्र खूपच खूबीने साकारलं आहे. त्यांचा विशेष प्रभाव भूमिकेवर जाणवतो. महाराजांचे महत्त्वाचे गुप्तहेर बहिर्जी नाईक हे पात्र स्वतः दिग्पालने साकारलं असून तो ही भूमिकेत पूरपूर उतरल्याचं दिसून येतं. वैभव मांगले गोपीनाथ बोकील पंत हे पात्र साकारत आहे. वैभवची अनोखी शैली चित्रपटात प्रेक्षकांना खिळवून ठेवते. बडी बेगम हे पात्र वर्षा उसगावर यांनी साकारलंय त्याही यात खूपच आकर्षक ठरल्या आहेत.

चित्रपटात अनेक ठिकाणी ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी ते अगदी उत्तम आहेत. मात्र काही ठिकाणी त्यावर आणखी काम करण्याची गरज असल्याचं दिसून येतं. याशिवाय अनेक सिन्स हे प्रत्यक्ष किल्ल्यावरही शूट केलेले आहेत. मात्र चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करतो. अनेक ठिकाणी भावुक सीन्स आहेत. जिथे प्रेक्षकांना कदाचित अश्रू आवरणं कठीण होईल.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू