'या' लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल लिंबू पाणी 
फोटो

'या' लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल लिंबू पाणी, फायदे होण्यावेजी उद्भवू शकतात पोटासंबंधित समस्या

निरोगी आरोग्यासाठी लिंबू पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. मात्र काहींच्या आरोग्यासाठी लिंबू पाणी अतिशय धोक्याचे ठरू शकते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे पोटासंबंधित किंवा आतड्यांसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात लिंबू पाण्याचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

सुरुची कदम
लिंबू पाण्यात सायट्रिक आम्ल मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करू नये. यामुळे शरीरात आणखीनच पित्त वाढते.
लिंबूमधील सायट्रिक ऍसिडमुळे दातांच्या वरच्या थराला नुकसान पोहचते. दातांवर पांढऱ्या रंगाचा चिकट थर जमा होऊ लागतो. ज्यामुळे दात अस्वच्छ दिसू लागतात.
लिंबू पाण्यात ऑक्सलेट आढळून येते, ज्यामुळे पित्ताशयात खड्डे होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लिंबू पाण्याचे सेवन करावे. अन्यथा शरीरसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
सांधे दुखीची समस्या असलेल्या लोकांनी आहारात कधीच लिंबू पाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे सांध्यांमधील वेदना वाढून आरोग्याला हानी पोहचते.
आपल्यातील अनेकांना लिंबू किंवा आंबट फळांची ऍलर्जी असते. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी लिंबू पाणी किंवा आंबट फळांचे सेवन करू नये.

Aai Tuljabhavani: संकेत तुळजाईच्या अष्टशस्त्रधारिणी महापर्वाचे! प्रेक्षक होणार मुग्ध

Sankashti Chaturthi: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Amla Thecha: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय! घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारा झणझणीत आवळ्याचा ठेचा

Butterfly Pea Flower : आरोग्यासाठी फायदेशीर आहे अपराजिता फूल! जाणून घ्या ब्लू टी बनवण्याची सोपी रेसिपी आणि फायदे

Zee Marathi: 'शिवानी चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही! पूजा बिरारीची ‘येतेच मी नांदायला’, भूमिका केली स्पष्ट