पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौरा संघ मुख्यालय रेशीमबाग आणि दिशाभूमी भेट (फोटो सौजन्य - एक्स)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. त्याचबरोबर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिशाभूमीला देखील भेट दिली आहे. बौद्ध भिक्षुकांसह मोदी यांनी अभिवादन केले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या स्मारकाला पुष्पांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षानंतर रेशीमबागला भेट दिली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे. यावेळी मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याचे मनभरुन कौतुक केले आहे.