NCP Politics : मोठा निर्णय होणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक NCP Politics : मोठा निर्णय होणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक
राजकारण

NCP Politics : मोठा निर्णय होणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची गुरुवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. - खासदार सुप्रिया सुळे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. - मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Krupadan Awale

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा, पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याचे दावे आणि महिला आरक्षण तसेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवरील पक्षाची भूमिका यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. बैठकीत आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात होणाऱ्या शेतकरी मोर्चावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबरपासून शेगाव ते नागपूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची तयारी रोहित यांनी केली आहे. त्यात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार का, यावर पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवारांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन आंदोलनाची दिशा ठरवावी, अशी काही नेत्यांची भूमिका आहे. अलीकडेच नागपूर दौऱ्यात रोहित पवार यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचेही समोर आले होते.

नागपुरात होणार अधिवेशन

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मोर्चात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार का, याबाबत पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत केवळ राजकीय समीकरणांवरच नव्हे, तर शेतकरी आंदोलनातील पक्षाच्या सहभागावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीतून पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत कोणते संकेत मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

FAQ

1. शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक कधी होणार आहे?

गुरुवारी शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

2. या बैठकीचे आयोजन कोणी केले आहे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

3. बैठक कुठे होणार आहे?

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.

Mumbai News: पावसाळ्यासाठी मनपा आतापासूनच सज्ज! रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वर्मा-लवंगारेंच्या सूचना

Share Market Today: शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगचे संकेत, कोणते शेअर्स तज्ज्ञांच्या रडारवर? जाणून घ्या

Vastu Tips: चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नका या वस्तू, नात्यांमध्ये येऊ शकतो दुरावा

Maharashtra Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य

Weather Update : राज्यातील हवामान राहणार संमिश्र; कुठं थंडी तर कुठं उष्णतेची लाट मिळणार अनुभवायला