गद्दारांची मांदियाळी असताना...; राहुल गांधी-शरद पवारांचा तो फोटो ट्विट करत काँग्रेसची भावनिक पोस्ट 
राजकारण

Maharashtra Politics: गद्दारांची मांदियाळी असताना...; राहुल गांधी-शरद पवारांचा तो फोटो ट्विट करत काँग्रेसची भावनिक पोस्ट

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आगामी विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

anuradha sagar
  • परिसीमन विधेयकावरील संकेतांवरून काँग्रेसची प्रतिक्रिया

  • राहुल गांधींच्या आधाराची आठवण

  • मार्च २०२६ च्या राज्यसभा निवडणुकीतील संख्याबळाचा उल्लेख

Congress Social Media Post on NCP SP: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला हिरवा कंदील देण्यात आला. त्यानंतर येत्या आठवडाभरात होणाऱ्या विशेष अधिवेशनात या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला म्हणजेच पाठिंबा देणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्या गटातील नेत्यांकडूनही तसे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

काँग्रेसने इन्स्टाग्रामवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये राहुल गांधी शरद पवार यांचा हात घट्ट पकडल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत "'गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता', अशी कॅप्शन लिहीली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने कसा त्याग केल्या याची आठवण करून देण्यात आली आहे.

Congress on delimitation bill: नेमकं काय म्हटलंय काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये ?

शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता… मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.

आणि आता काय?

परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.

केरळ काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष वाढला; राहुल गांधी आणि खर्गेंना भेटणार प्रदेशाध्यक्ष

Marathi New Serial: सासू-सुनेची OG जोडी पुन्हा एकत्र! ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Mahatma Phule Punyatithi: आज महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ नोव्हेंबरचा इतिहास

Vastu Tips: जुन्या कपड्यांचा घरात पुसणी म्हणून वापर करताय? चुकूनही करू नका ही चूक; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम

राजकमल रेल्वे पुलाचे पाडकाम अंतिम टप्यात! बांधकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वे स्टेशन चौक-बेलपुरा मार्ग बंद