विधानसभेचे संख्याबळ आता लवकरच वाढणार; 288 असलेली सदस्यसंख्या 432 वर जाणार?  विधानसभेचे संख्याबळ आता लवकरच वाढणार; 288 असलेली सदस्यसंख्या 432 वर जाणार?
राजकारण

विधानसभेचे संख्याबळ आता लवकरच वाढणार; 288 असलेली सदस्यसंख्या 432 वर जाणार?

देशात मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे 288 सदस्यांचे संख्याबळ वाढून 432 पर्यंत पोहोचू शकते. या संभाव्य बदलामुळे राज्यातील राजकीय सत्ताकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते.

Krupadan Awale
  • देशात मतदारसंघ पुनर्रचनेचा (Delimitation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

  • मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून हालचाली वाढल्याचा दावा केला जात आहे.

  • महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ २८८ सदस्यांचे आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच देशात मतदारसंघ पुनर्रचनेचा (डिलिमिटेशन) मुद्दा पुन्हा चर्चेत येत आहे. त्यानुसार, सत्ताधारी भाजपकडून हे विधेयक मंजूर करण्यासाठी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. असे असताना आता महाराष्ट्राच्या राजकीय नकाशात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हे विधेयक मंजूर झाले तर महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळही वाढणार आहे.

देशात मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे 288 सदस्यांचे संख्याबळ वाढून 432 पर्यंत पोहोचू शकते. या संभाव्य बदलामुळे राज्यातील राजकीय सत्ताकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते. विशेष म्हणजे, मुंबई महानगर प्रदेशातील विधानसभा मतदारसंघांची संख्या 92 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून विधानसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाल्यास एकूण जागांची संख्या ४३२ होईल. त्यानुसार, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमताचे संख्याबळही वाढून २१७ होईल.

दरम्यान, सध्याच्या विधानसभेत बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता असते. मात्र, प्रस्तावित संख्याबळानुसार राज्यातील राजकीय पक्षांना सत्तास्थापनेसाठी अधिक मोठी ताकद उभी करावी लागेल.

मुंबई महानगर प्रदेशाचे राजकीय महत्त्व वाढणार

संभाव्य पुनर्रचनेतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे एमएमआरमधील जागांची संख्या. महानगर प्रदेशातील विधानसभा मतदारसंघांची संख्या ९२ पर्यंत पोहोचू शकते, असा दावा करण्यात आला आहे. ४३२ सदस्यांच्या विधानसभेत या ९२ जागांचा वाटा सुमारे २१.३ टक्के असेल. विशेष म्हणजे, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या २१७ जागांच्या बहुमताच्या आकड्याच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशातील ९२ जागा म्हणजे जवळपास ४२.४ टक्के होतात. त्यामुळे या प्रदेशातील राजकीय वर्चस्व राज्याच्या सतास्थापनेच्या गणितात अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

सत्तेच्या राजकारणात मुंबई ठरणार निर्णायक

मुंबई महानगर प्रदेशात शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि काँग्रेस यांच्यात राजकीय प्रभावासाठी स्पर्धा आहे. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या शहरी राजकारणाच्या केंद्रांमध्ये कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहते, यावर भविष्यातील विधानसभा निवडणुकांचे गणित अवलंबून राहू शकते. जर या प्रदेशातील जागांची संख्या खरोखरच ९२ पर्यंत वाढली, तर येथील राजकीय यश राज्यव्यापी सत्तास्थापनेत निर्णायक ठरू शकते.

FAQ

प्रश्न 1 : महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ किती आहे?

उत्तर : महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ २८८ सदस्यांचे आहे.

प्रश्न 2 : मतदारसंघ पुनर्रचना झाल्यास विधानसभेचे संख्याबळ किती होऊ शकते?

उत्तर : प्रस्तावानुसार विधानसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाल्यास सदस्यसंख्या २८८ वरून ४३२ पर्यंत पोहोचू शकते.

प्रश्न 3 : मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे काय?

उत्तर : लोकसंख्या आणि इतर निर्धारित निकषांच्या आधारे लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या सीमा तसेच जागांची पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेला मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) म्हणतात.

Exclusive: सातारी स्वॅग, बेधडक स्वभाव; ‘येतेच आता मी नांदायला’मधील भूमिका मनाला भावली – हर्षद अतकरी

Weather Update : राज्यातील हवामानात पुन्हा बदल; थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आता नाही

२८ नोव्हेंबरचे राशीभविष्य: आज ५ राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा? कोणाचे नशीब चमकणार?

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी CM Devendra Fadnavis?

थंडीत बाईकच्या सायलेन्सरमधून पांढरा धूर? सामान्य की धोक्याचा इशारा?