रोहित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया 
राजकारण

Supriya Sule Apologies: मी हात जोडून माफी मागते; रोहित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

Supriya Sule Apologies: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर रोहित पवार यांनी "पुण्याच्या पालकमंत्र्यांना दादांसारखं काम करता येत नाही, पुण्याला कठोर पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा पवारांना ताकद द्या" अशी टीका केली होती.

anuradha sagar
  • सुप्रिया सुळे यांची हात जोडून माफी

  • सुनेत्रा पवारांवरील टीकेमुळे वाद

  • अजित पवार गटाचा आंदोलनाचा इशारा

Supriya Sule Apology: 'रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं. त्याबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. रोहितने दिलगीरी व्यक्त केल्यावर, त्याने माफी मागितल्यावर तर परत त्यांचं काय म्हणणं आहे. रोहित पवार यांच्याकडून काल बोलताना जर अनावधानाने काही बोललं गेलं असेल तर रोहितने दिलगीरी व्यक्त केली आहे. एकदा दिलगीरी व्यक्त केल्यानंतर आता विषय संपला आहे ना. पण त्यानंतरही जर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा नेता, कार्यकर्ता यांच्या भावना दुखावली गेली असतील तर त्याच्या वतीने मी हात जोडून माफी मागते.' अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात एका गुन्ह्यातील गुन्हेगार मंदार किवळे याच्यावर दोन दिवसांपूर्वी सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात किवळे गंभीर जखमी झाला. या हल्ल्याच्या प्रकारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती.

पुण्याच्या पालकमंत्र्यांना दादासारखं काम करता येत नाही, पुण्याला कठोर पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा पवारांना ताकद द्या," असे म्हणत रोहित पवार सुनेत्रा पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता.  रोहित पवारांच्या याच टिकेवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या सर्व घटनाक्रमावर सुप्रिय सुळे यांनी माफी मागत स्पष्टीकरणही दिले.

कधीकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील महिला आणि मी एकत्र राहिलो आहोत, एकत्र अनेक आंदोलने केली आहेत, त्यामुळे त्यांनी हा विषय शांततेत सोडवावा, ही विनंती करते. पण त्यानंतरही त्यांना विषय वाढवायचा असेल तर मला विषय वाढवण्यात इंटरेस्ट नाही त्यांच्या समाधानासाठी मी सॉरी म्हणते. रोहित पवार एखादा शब्द बोलून गेला असेल आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील,मी त्यांच्या भावनांचा आदर करते. कुणाला वाईट वाटलं असेल त्यांना काही हवं असेल तर तेही मी करेल, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या पालकमंंत्री आहेत फक्त पुणे शहराच्या नाहीत. पण पुणे शहरात जी गुन्हेगारी वाढत आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे म्हणून मी त्यांना सांगत आहे. जर दुसरे कोणी गृहमंत्री असते तर मी त्यांनाही सांगितलं असतं. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुण्याची प्रतिष्ठा खराब होत नाही. तर गुंतवणुकीलाही अडचणी येतात, हा इकोनॉमिक गेम आहे. जिथे गुन्हे वाढतात तिथे कोणी गुंतवणूक करेल का, असा प्रतिप्रश्नही सुप्रिया सुळेंनी यावेळी उपस्थित केला.

Crochet: तुम्हीही क्रोशे विणकाम करताय का? जाणून घ्या धाग्यांचे प्रकार आणि विणकाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात!

Delimitation Bill : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केला व्हीप; पक्षातील सर्व खासदारांनी...

Navi Mumbai Wari: स्मार्ट सिटीमध्ये जपली जातेय ६५ वर्षांची वारीची परंपरा; पाच दिंड्यांतून जपला जातो संतविचारांचा वारसा

आयारामांचे राजकीय पुनर्वसन, निष्ठावंतांच्या वाट्याला मात्र प्रतीक्षाच ! नांदेड भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी

EPFO UPI PF Withdrawal : PF चे पैसे काढायला महिनाभर वाट पाहण्याची गरज नाही! थेट UPI ने खात्यात येणार रक्कम; फक्त 'हे' काम करा