श्रावण विशेष

श्रावणी सोमवारी 'या' पध्द्तीने उपवास करा , महादेवाची होईल कृपा!

Rashmi Dongre

सोमवारचा दिवस हा भगवान शंकरासाठी (Lord Shiva) समर्पित आहे. सध्या श्रावण महिना (Shravan) सुरु असून सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त श्रावण सोमवारी विविध उपाय (Monday Remedy) करतात. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा (Shravan Somvar Puja-Vidhi) केली जाते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून भगवान शिवची आराधना (Shiv Puja) करत शिवाष्टकचा पाठ केला पाहिजे. यासह दुधाचे काही उपाय केल्याने लाभ होतो.

भगवान शंकर हे नावाप्रमाणे साधे-भोळे आहे. स्वच्छ मनाने पूजा केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. शिव पूजेत दुधाला महत्त्व आहे. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने सकारात्मक परिणाम मिळतो. यासह दुधाचे काही उपाय केल्याने खूप लाभ मिळतो.

  • ग्रह दोष दूर करण्यासाठी दूध अर्पण करा सोमवारी कोणत्याही शिव मंदिरात जात शिवलिंगवर कच्चे दूध अर्पण करावे. ५ ते ७ सोमवारपर्यंत हा उपाय करावा. यामुळे कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो. यासह मनातील सर्व इच्छा पूर्ण होत व्यक्तीला सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.
  • दूध-जलाचा अर्पण तुम्हाला जर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करावे. सोबत ‘ओम सोमेश्वराय नम:’ मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच पौर्णिमेला जल मिश्रित दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे, असे केल्याने भगवान शंकराची कृपा लाभते.
  • नोकरा किंवा व्यवसाय दूध ठेवा नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे. त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा. दरम्यान, ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करा.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू