Sports

फिफा विश्वचषच्या उद्घाटन प्रसंगी BTS गायक Jungkook करणार परफॉर्म

Pooja Pawar

जगातील सर्वात मोठी फ़ुटबाँल स्पर्धा असलेली फिफा विश्वचषक ही स्पर्धा येत्या २० नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. यंदा ही स्पर्धा कतार येथे होणार असून रविवारी त्याचा उदघाटन सोहोळा मोठ्या उत्साहात पारपडणार आहे. फिफा विश्वचषक २०२२ या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कोरियन बँड ( K-pop Band ) बीटीएस ( BTS) मधील सदस्य जंगकूक हा परफॉर्म करणार आहे. याबाबत बीटीएसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक निवेदन जारी केले आहे. त्यामुळे फुटबॉल रसिकांसह बीटीएस चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

बीटीएस सदस्य जंगकूक फिफामध्येही आपल्या गायकी आणि सादरीकरणाची जादू पसरवणार असून २० नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजल्यापासून भारतीय प्रेक्षकांना फिफा विश्वचषक उद्घाटन सोहळा पाहता येणार आहे. जंगकूक शिवाय फिफा ओपनिंग सेरेमनीला शकीरा, नोरा फतेही आणि दुआ लिपा देखील परफॉर्म करणार आहेत.

कोण आहेत BTS?

BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप (Kpop Boy Band) आहे. बीटीएस (BTS) म्हणजेच बांगतान बॉईज् (Bangtan Sonyeondan or Beyond the Scene) हा दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध बँड आहे. या बँडने कोरियन संगीत आणि कोरियन पॉप (K Pop) संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. या बँडमध्ये सात सदस्य आहेत. त्यांची नावं किम सोकजिन (Jin Aka Kim Seok-Jin), मिन युंगी (Suga Aka Min Yoongi), जंग होसोक (J Hope Aka Jung Ho-seok), किम नामजून (RM Aka Kim Nam-Joon), पार्क जीमिन (Jimin Aka Park Jimin), किम तेह्युंग (V - Kim Tae-Hyung), आणि जीओन जंगकूक (Jungkook Aka Jeon Jung-kook) अशी आहेत..

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू