जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (World Shooting Championships) पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. रुद्रांक्ष पाटील, किरण जाधव आणि अर्जुन बाबुता या भारताच्या तिरंदाजांनी शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत हा विक्रम केला आहे. भारताच्या या त्रिकुटाने अंतिम फेरीत चीनच्या खेळाडूंवर १६-१० असा विजय संपादन करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
रुद्रांक्ष, किरण आणि अर्जुन यांच्यासमोर यांगा हाओरॅन, लिहाओ शेंग, साँग बुहान या ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील विजेत्यांचे आव्हान होते. मात्र तरी देखील भारतीय खेळाडूंनी सुरुवातीला १४-२ अशी आघाडी घेतली. मात्र चीनच्या खेळाडूंनी पुढील चार मालिकांमध्ये विजय मिळवत ही आघाडी १४-१० अशी कमी आणली होती. पण अखेरच्या मालिकेत भारतीय नेमबाजांनी आपला खेळ उंचावला आणि १६-१० अशी आघाडी घेऊन विजय मिळवला.