यशस्वी जायसवालने केला नकोसा रेकॉर्ड स्वतःच्या नावे  सोर्सः क्रिकइन्फो
Sports

IND vs NZ: यशस्वी जायसवालच्या नावे लज्जास्पद रेकॉर्ड! SENA देशात शून्यावर बाद होणारा सहावा खेळाडू, विराटलाही सोडले मागे

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीत, भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवाल पहिल्या डावात सहा चेंडू खेळून खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, यासह त्याने नको असलेला रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे.

दिपाली नाफडे
  • यशस्वी जायसवालच्या नावे नकोसा रेकॉर्ड 

  • विराट कोहलीला सोडले मागे 

  • पुन्हा एकदा शून्यावर यशस्वी बाद 

Ind vs NZ: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान क्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हल मैदानात खेळल्या जात असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात किवीच्या संघाने पहिल्या डावात ३५६ धावांची आघाडी घेतली आणि त्यानंतर भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी करत दुसऱ्या दिवशी सर्वांचेच मन खट्टू केले आहे. त्यातही सलामीवीर यशस्वी जायसवालने पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती मात्र आता दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात मात्र नको असलेला रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे. 

केवळ ६ बॉल्सचा सामना करत हेन्रीच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा यशस्वी जायसवाल शून्यावर बाद झाला यासोबतच, जयस्वाल अशा एका अनपेक्षित क्लबमध्ये सामील झाला, ज्याचा यापूर्वी कोणताही आघाडीचा भारतीय फलंदाज सदस्य नव्हता. यशस्वी जयस्वाल आता सर्व सेना (SENA) देशांमध्ये शून्यावर बाद होणारा केवळ सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. जयस्वालने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय खेळाडू म्हणून विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.

जायसवाल आता कुंबळे-बुमराह क्लबमध्ये सामील

आपल्या कसोटी पदार्पणापासून स्वदेशी आणि परदेशात शानदार फलंदाजीचा विक्रम नोंदवणाऱ्या यशस्वी जैस्वालने आता सर्व सेना (SENA) देशांमध्ये शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत जैस्वाल अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या पंक्तीत सामील झाला आहे, जे यापूर्वी सर्व सेना (SENA) देशांमध्ये किमान एका डावात शून्यावर बाद झाले आहेत.

WTC मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद

आठ वेळा शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या यशस्वी जैस्वालने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. डब्ल्यूटीसीच्या इतिहासात २३ वेळा शून्यावर बाद झालेले जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे आता जैस्वालच्या पुढे आहेत, तर सिराज १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय खेळाडू

  • जसप्रीत बुमराह - २३ वेळा शून्यावर बाद

  • मोहम्मद सिराज - १६ वेळा शून्यावर बाद

  • यशस्वी जायसवाल - ८ वेळा शून्यावर बाद

  • विराट कोहली - ७ वेळा शून्यावर बाद

  • मोहम्मद शमी - ७ वेळा शून्यावर बाद

JSW Combat SUV: पैसे असूनही खरेदी करता येणार नाही ही SUV! फक्त 500 ग्राहकांसाठी खास नियम

Mumbai Crime: महिलांसाठी मुंबई असुरक्षितच! मुलगी प्लॅटफॉर्मवर उभी असताना आईवर शौचालयात मारहाण अन्....; घाटकोपर रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

Travel: मुंबईतील ५ अनोखी पर्यटनस्थळे, शहरातच घ्या निसर्गचा आणि इतिहासाचा आनंद!

RBI New ATM PoS Rules : फेल ATM व्यवहारांवरही लागणार चार्ज? किती वेळा मोफत काढता येणार पैसे? RBI ची नवी नियमावली

Pakistan Crisis : पाकिस्तानची आरोग्यसेवा धोक्यात! औषध उत्पादनात 21.5% घट; स्टेंट आणि ऑक्सिजनअभावी शस्त्रक्रिया रखडल्या