कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ ही स्पर्धा सध्या इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये सुरु आहे. (Commonwealth Games 2022) या स्पर्धेत हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात भारताला ऑस्ट्रेलियाने ७-० अशा मोठ्या फरकाने मात दिली. ज्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
अंतिम सामन्यामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघ (India Men's Hockey Team vs Australia Hockey Team) यांच्यात सामना रंगला होता. मात्र अंतिम सामन्यात मात्र भारत सुरुवातीपासून पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्वॉर्टरपासून खूप गोल करत होता. संपूर्ण सामन्यात भारताला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे भारत ऑस्ट्रेलियाकडून ७-० ने पराभूत झाला.
भारताला गेल्या वर्षी टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाकडून १-७ असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर भारतीय संघ फारशी चांगली कामगिरी करत नसल्याचे आजवरच्या सामन्यांवरून दिसून आले आहे.