Sports

विश्वविजेत्या फ्रान्सचा ट्युनिशियाकडून धक्कादायक पराभव

फ्रान्सचा हा वर्ल्डकपमधील सलग सहा विजयानंतरचा पहिला पराभव असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परंतु ट्युनिशियाने फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला असला तरी त्यांना बाद फेरी मात्र गाठता आली नाही.

Pooja Pawar

फिफा विश्वचषकातील रंगत आता अधिकच वाढली आहे. काल बुधवारी फ्रान्स विरुद्ध ट्युनिशिया यांच्यात फुटबॉलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सचा ट्युनिशियाने १-० असा पराभव केला. फ्रान्सचा हा २०१४ नंतरचा वर्ल्डकपमधील पहिलाच पराभव असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परंतु ट्युनिशियाने फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला असला तरी त्यांना बाद फेरी मात्र गाठता आली नाही.

फ्रान्स आणि ट्युनिशिया यांच्यातील सामना पहिल्या हाफपासूनच चुरशीचा राहिला. बलाढ्य फ्रान्सने ट्युनिशियाच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया केल्या. मात्र फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये ट्युनिशियाने फ्रान्सवर पहिला गोल करत विश्वविजेत्यांना मोठा धक्का दिला. वाहबी खाझरीने 58 व्या मिनिटाला लौडोनीच्या सहाय्याने गोल डागला. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या फ्रान्सने आपली अव्वल फळी मैदानात उतरवली एम्बाप्पे आणि ग्रीझमन मैदानात आले. मात्र या दोघांनाही ९० मिनिटापर्यंत बरोबरीचा गोल करता आला नाही.

दरम्यान, स्टॉपेज टाईंमच्या १० व्या मिनिटाला ग्रीझमवने गोल केला खरा मात्र रेफ्रीने हा गोल VAR नंतर अवैध ठरवला. यामुळे अखेच्या क्षणी पराभवाची नामुष्की टाळण्याचा फ्रान्सचा प्रयत्न देखील फेल गेला. फ्रान्सचा हा वर्ल्डकपमधील सलग सहा विजयानंतरचा पहिला पराभव ठरला.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू