Sports

आज अंडर-१६ महिला हॉकी लीगचे बिगुल वाजणार!

Pooja Pawar

खेलो इंडिया मोहिमेतंर्गत अंडर-१६ महिला हॉकी लीग २०२२ चे बिगुल उद्या पासून वाजणार आहे. या लीग मध्ये तब्बल १६ महिला हॉकी संघ सहभागी होणार असून या स्पर्धेला भारताच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. या हॉकी लीगमध्ये सामान्यांसाठी संघाची विभागणी ही दोन पूल मध्ये करण्यात आली असून यात पूल अ आणि ब असे दोन पूल असणार आहेत.

खेलो इंडिया अंडर-१६ महिला हॉकी लीग २०२२ या स्पर्धेचा पहिला टप्पा २३ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असून या लीगमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला २ गुण तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना १-१ असे गुण दिले जातील. तर पराभूत संघांना शून्य गुण मिळतील.

या संघांचा आहे सहभाग :

खेलो इंडिया अंडर-१६ महिला हॉकी लीगमध्ये अ गटात भारतीय क्रीडा प्राधिकरण 'अ', भाई बहलो हॉकी अकादमी भगता, घुमनहेरा रायझर अकादमी, सिटीझन हॉकी इलेव्हन, स्मार्ट हॉकी अकादमी रायपूर, प्रीतम सिवाच हॉकी अकादमी सोनीपत, मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आणि स्पोर्ट्स हॉस्टेल भुवनेश्वर यांचा समावेश आहे.

तसेच ब गटात भारतीय क्रीडा प्राधिकरण 'ब', अनंतपूर हॉकी अकादमी, एचएआर हॉकी अकादमी, दिल्ली हॉकी, मध्य प्रदेश हॉकी अकादमी, ओडिशा नेव्ही टाटा हॉकी हाय परफॉर्मन्स सेंटर, सॅल्यूट हॉकी अकादमी आणि गुजरात क्रीडा प्राधिकरण अकादमी यांचा समावेश असेल.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू