Blinkit  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
विज्ञान तंत्रज्ञान

Blinkit App Privacy Controversy: तुमच्या फोनमधील अ‍ॅप्सवर Blinkit ची नजर? बॅटरी आणि Wi-Fi बाबतही मोठा दावा!

Blinkit च्या अँड्रॉइड अॅपमधून वापरकर्त्यांच्या फोनमधील माहिती तपासली जात असल्याचा दावा कंटेंट क्रिएटर अनिका बेरी हिने केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अॅप फोनमधील जवळपास 21 इतर अॅप्स, Wi-Fi नेटवर्कचे नाव, फॉन्ट साईज, स्क्रीन झूम, बॅटरी आणि CPU यांची माहिती तपासू शकते.

Riddhi Vanne
  • Blinkit अॅपवर माहिती गोळा करण्याचा आरोप

  • फोनमधील अॅप्स आणि Wi-Fi तपासण्याचा दावा

  • कंपनीने आरोप फेटाळत दिलं स्पष्टीकरण

Blinkit App Privacy: आपण Blinkit उघडतो, दूध, ब्रेड किंवा काही गरजेचं सामान ऑर्डर करतो आणि काही मिनिटांत डिलिव्हरी दारात येते. पण कधी विचार केलाय का, सामान ऑर्डर करण्यापलीकडे हे अॅप तुमच्या फोनबद्दल किती माहिती ठेवतं?तुमच्या फोनमध्ये कोणते अॅप्स आहेत, तुम्ही कोणत्या Wi-Fi ला जोडलेले आहात, फोनची बॅटरी किती उरली आणि तुम्ही स्क्रीनवर किती मोठं अक्षर वापरता? या सगळ्या गोष्टींवरून आता एक नवी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर एक कंटेंट क्रिएटर अनिका बेरी हिने दावा केला की तिने Blinkit च्या Android अॅपचा कोड उघडून तपासला.

• अॅपच्या कोडमध्ये काय सापडलं?

1. 21 अॅप्स चेक करतो : अनिकाच्या म्हणण्यानुसार, Blinkit चं अॅप फोनमध्ये असलेल्या जवळपास 21 दुसऱ्या अॅप्सची माहिती चेक करू शकतं. यात Instagram, Zomato, WhatsApp आणि Slack सारख्या अॅप्सची नावं सांगितली गेली.

2. यातून काय कळतं? : फोनमध्ये कोणते अॅप्स आहेत, यावरून त्या माणसाची आवड, काम आणि दुसऱ्या सवयींचा अंदाज लावता येऊ शकतो, असं तिचं म्हणणं आहे. उदा. फोनमध्ये एखाद्या खास कामाचं अॅप असेल तर त्याच्या व्यवसायाबद्दल अंदाज लावता येतो.

• तुमच्या वयाचा पण अंदाज लावता येतो का?

या प्रकरणातला सगळ्यात भारी दावा फोनच्या स्क्रीनशी जोडलेला आहे.

1. फॉन्ट साईज : अनिकाच्या म्हणण्यानुसार, Blinkit अॅप फोनमध्ये वापरला जाणारा फॉन्ट साईज, स्क्रीन झूम आणि स्क्रीन रीडर सारख्या सेटिंग्स पण चेक करतं.

2. वय कसं कळतं? : समजा एखादा माणूस फोनमध्ये अक्षरं खूप मोठी ठेवतो. काही लोकांना छोटी अक्षरं वाचायला त्रास होतो म्हणून ते असं करतात. या सेटिंग्सवरून त्या माणसाचं वय आणि त्याची खरेदी करण्याची पद्धत याचा अंदाज लावता येईल, असा दावा तिने केला.

3. पुरावा नाही : पण या दाव्याला पक्का पुरावा अजून समोर आलेला नाही. फोनमध्ये मोठा फॉन्ट वापरणं म्हणजे तो माणूस म्हातारा आहे किंवा तो किंमतीची तुलना करत नाही, असं होत नाही.

• Wi-Fi च्या नावावरून घर आणि कुटुंब ओळखलं जातं?

1. SSID काय असतं? : अनिकाच्या म्हणण्यानुसार, Blinkit अॅप Wi-Fi नेटवर्कचं नाव म्हणजे SSID आणि युजरचं लोकेशन एकत्र करून माहिती ठेवू शकतं.

2. उदाहरण : समजा तुम्ही घरच्या Wi-Fi वरून Blinkit वर ऑर्डर केलात. थोड्या वेळाने तुमच्या घरातलाच दुसरा माणूस त्याच Wi-Fi वरून आपल्या फोनवर ऑर्डर करतो. अॅपकडे Wi-Fi आणि लोकेशनची माहिती असेल तर हे दोन्ही अकाऊंट एकाच घरातले आहेत, असा अंदाज लावता येईल.

3. कंपनीचं म्हणणं काय? : Blinkit ने हा आरोप फेटाळला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Wi-Fi चं नाव चेक करण्याचा उद्देश लोकेशन लवकर ओळखणं आहे. प्रत्येक वेळी GPS ची वाट बघण्यापेक्षा अॅप आधीच्या माहितीने लवकर सुरू होऊ शकतं.

• बॅटरी कमी असेल तर महाग सामान दाखवलं जातं का?

1. बॅटरी आणि CPU : अनिकाच्या म्हणण्यानुसार, Blinkit अॅप फोनची बॅटरी आणि CPU ची माहिती पण चेक करतं. तिने प्रश्न विचारलाय की जर एखाद्याच्या फोनची बॅटरी कमी असेल तर अॅप त्याच्या खरेदीच्या घाईचा फायदा घेऊ शकतं का?

2. विचार काय? : जर एखाद्याच्या फोनची बॅटरी फक्त 5% उरली असेल आणि त्याला लगेच काही सामान हवं असेल तर तो जास्त वेळ वेगवेगळे पर्याय बघणार नाही. अशात तो पटकन ऑर्डर करेल आणि सर्ज चार्ज पण लगेच देईल.

3. कंपनीची सफाई : Blinkit ने म्हटलंय की बॅटरी आणि CPU ची माहिती अॅपची परफॉर्मन्स चांगली ठेवला वापरली जाते. फोन कमजोर असेल तर अॅप काही जास्तीचे अॅनिमेशन आणि जड फीचर्स कमी करू शकतं. यामुळे ऑर्डर करणं अडत नाही.

आता 112 प्रकारचे आजार, शस्त्रक्रियांवर सरकारी रुग्णालयांत उपचार; मात्र डॉक्टरांअभावी उपचाराचा प्रश्न

Crime News: नवरा आहे की राक्षस! पत्नीला बेशुद्ध करून 3 वर्षे अनोळखी पुरुषांकडून बलात्कार, व्हिडिओ बनवून ...; ६० हून अधिक गुन्ह्यांची कबुली

Reserve Bank Repo Rate : कर्जदारांना फटका बसणार? RBI पुन्हा रेपो रेट वाढवणार? EMI आणि कर्जावर काय होणार परिणाम?

EV प्रेमींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीत Hyundai आणि Tata च्या नव्या Car'sची प्रतीक्षा संपणार

तुमच्याही वाहनावर ऑनलाईन पावती आहे? तर काळजी नको ! आता दंडावर मिळणार मोठी सवलत