जिमेलचा वापर करताना सहसा असं पाहायला मिळतं की, अनेक महत्त्वाचे ईमेल्स थेट इनबॉक्समध्ये न जाता स्पॅम फोल्डरमध्ये जातात. ही समस्या तेव्हा वाढते, जेव्हा अनेक महत्त्वाच्या कंपन्या, बँक किंवा ऑफीसचे मेसेज सतत स्पॅम फोल्डरमध्ये जमा होऊ लागतात. गूगलचं असं म्हणणं आहे की, जेव्हा स्पॅम फोल्डरमधील ईमेल्सना नॉट स्पॅम असं मार्क केलं जात नाही, तेव्हा ही समस्या उद्भवते. तुम्हाला देखील अशा काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून ही समस्या सोडवू शकता.
कंपनीचं असं म्हणणं आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या ईमेलचे स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याचे कारण म्हणजेच तो ईमेल स्पॅम फोल्डरमधून हटवून त्याला नॉट स्पॅम केले जात नाही. याशिवाय सेंडरचा ईमेल ॲड्रेस गूगल कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह नसल्यास किंवा योग्य फिल्टर सेट केला नसल्यास महत्त्वाचे ईमेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतात. अशावेळी सर्वात आधी जिमेल ओपन करा आणि डाव्या बाजूला असलेल्या 'मोअर' वर जा. त्यानंतर, 'स्पॅम' फोल्डर उघडा. जो ईमेल तुम्हाला इनबॉक्समध्ये पाहिजे आहे, तो निवडा आणि वरच्या बाजूला दिसणाऱ्या नॉट स्पॅम पर्यायावर क्लिक करा. आता, स्पॅम फोल्डरमधून ईमेल काढून टाकला जाईल. (फोटो सौजन्य: Pinterest)
कोणत्याही विश्वसनीय सेंडरचा ईमेल ॲड्रेस गूगल कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह करणं देखील गरजेचं असू शकतं. यासाठी गूगल कॉन्टॅक्ट्स ओपन करा आणि क्रिएट कॉन्टॅक्ट्स पर्याय निवडा. आता सेंडरचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरा आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करा. यामुळे जिमेलला त्या सेंडरची ओळख पटवण्यासाठी मदत होईल आणि ईमेल स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल.
जर एखाद्या विशिष्ट सेंडरचे ईमेल सतत स्पॅममध्ये जात असतील तर जिमेलमध्ये त्यासाठी एक फिल्टर बनवला जाऊ शकतो. लक्षात ठेवा की, हे काम कंप्यूटरवर जिमेल ओपन करून करावे लागणार आहे. यासाठी, जिमेल उघडा आणि वरच्या बाजूला असलेल्या सर्च बारमधील 'शो सर्च ऑप्शन्स' निवडा. त्यानंतर, 'फ्रॉम' या रकान्यात सेंडरचा ईमेल पत्ता टाका आणि 'क्रिएट फिल्टर' वर क्लिक करा.
फिल्टर बनवल्यानंतर तुम्हाला नेवर सेंड इट टू स्पॅम असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर क्रिएट फिल्टरवर क्लिक करा. यामुळे जिमेलला त्या प्रेषकाकडून येणारे ईमेल्स 'स्पॅम'मध्ये पाठवणे थांबवण्याची सूचना मिळेल. जर एखाद्या विश्वसनीय सेंडरकडून येणारे ईमेल्स सतत 'स्पॅम' फोल्डरमध्ये जात असतील, तर ही सेटिंग सर्वात उपयुक्त पद्धतींपैकी एक ठरू शकते.