फोटो सौजन्य - pinterest  
विज्ञान तंत्रज्ञान

India Post मधून तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी मॅसेज आला आहे का? आताच सावध व्हा

काही दिवसांपूर्वीच देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज आला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं की, तुमच वीज कनेक्शन कापलं जाणार आहे. यामुळे देशभरातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर आता देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज पुन्हा व्हायरल होत आहे. पण हा मॅसेज तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी आहे. India Post च्या नावाखाली हा बनावट मॅसेज पाठवण्यात आला आहे.

हर्षदा जाधव

देशात सुरु असणाऱ्या ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्गा शोधत आहेत. कधी बनावट अॅप्स तर कधी बनवाट वेबसाईट, तर कधी खोटे मॅसेज. काही दिवसांपूर्वीच देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज आला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं की, तुमच वीज कनेक्शन कापलं जाणार आहे. यामुळे देशभरातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मॅसेज व्हायरल झाला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं की, बिल भरलं नसल्यामुळे तुमचं गॅस कनेक्शन कापलं जाणार आहे. यानंतर आता देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज पुन्हा व्हायरल होत आहे. पण हा मॅसेज तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी आहे. India Post च्या नावाखाली हा बनावट मॅसेज पाठवण्यात आला आहे.

India Post च्या नावाखाली आलेल्या या बनावट मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, 'तुमचं पार्सल इंडिया पोस्टच्या गोदामात आलं आहे, परंतु अपूर्ण पत्त्याच्या माहितीमुळे ते वितरित केलं जाऊ शकत नाही. या कारणास्तव तुम्हाला 12 तासांच्या आत एसएमएसमध्ये दिलेल्या वेब लिंकचा वापर करून तुमचा पत्ता अपडेट करावा लागेल. पत्ता अपडेट केला नाही तर तुमच्या सर्व ऑर्डर रद्द केल्या जातील.' पार्सल रद्द होणार या भितीने अनेकजण त्या बनावट वेबसाईटवर क्लिक करतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात. एवढेच नाही तर सायबर स्कॅमर लोकांना बनावट फोन करतात आणि आपण इंडिया पोस्टचा अधिकारी बोलत असल्याचं सांगून लोकांची फसवूणक करतात.

India Post च्या नावाखाली आलेल्या या बनावट मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास ही लिंक एक नवं वेब पेज ओपन करेल. येथे तुम्हाला पुन्हा वितरणासाठी 80 रुपये किंवा 100 रुपये टोकन रक्कम भरावी लागेल. पण यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स त्यामध्ये भरणे आवश्यक असते. कमी पैशांमुळे, लोक त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा तपशील देऊन पेमेंट करतात. पण या चुकीमुळे, लोकांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे तपशील घोटाळे करणाऱ्यांपर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे लुटले जातात. परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर या सायबर स्कॅमपासून अगदी सहज स्वत:ला वाचवू शकता.

  • अनोळखी मॅसेज आणि ईमेलपासून सावध रहा. त्या मॅसेजमधील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच योग्य पाऊल उचला. जेव्हाही तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवरून एखादी वस्तू ऑर्डर करा, तेव्हा नेहमी त्याचे ॲप उघडा आणि वितरणाशी संबंधित सर्व माहिती तपासा.
  • तुम्हाला अनोळखी ईमेल येत असतील तर आधी ईमेल ॲड्रेस किंवा वेबसाइट डोमेन तपासा. स्कॅमर मूळ पत्त्यासारखे ईमेल पत्ते किंवा वेबसाइट डोमेनचा वापर करतात.
  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अधिक माहितीसाठी नेहमी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • फोन किंवा मॅसेजवरून कोणत्याही संस्थेच्या कोणीही तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती किंवा पेमेंट डिटेल्स विचारत असेल तर त्या संस्थेच्या कार्यालयाला भेट द्या किंवा हेल्पलाईनशी संपर्क साधा.

MarMarathi Theatre News : ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी टप्पा! २५ प्रयोग पूर्ण, पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला