WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस  
विज्ञान तंत्रज्ञान

WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस

WhatsApp Features: व्हॉट्सॲपवर विविध असे फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपली प्रायव्हसी अधिक मजबूत होते. असेच एक फीचर म्हणजेच चॅट लॉक. व्हॉट्सॲपचे चॅट लॉक फीचर नक्की काय आहे आणि याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया.

हर्षदा जाधव
  • व्हॉट्सॲपमुळे दूर असलेल्या लोकांसोबत देखील अगदी सहज संवाद साधला जाऊ शकतो

  • व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमच्या खास व्यक्तीचे चॅट्स फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक करू शकता

  • व्हॉट्सॲपचे चॅट लॉक फीचर एखाद्या खास चॅटसाठी एक वेगळा फोल्डर तयार करते

WhatsApp Update: जगभरातील करोडो लोक मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर करतात. आपण व्हॉट्सॲपवर आपल्या मित्रांसोबत, कुटूंबातील सदस्यांसोबत बोलतो, फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करतो. खरं तर व्हॉट्सॲपमुळे दूर असलेल्या लोकांसोबत देखील अगदी सहज संवाद साधला जाऊ शकतो. व्हॉट्सॲपमुळे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स देखील अगदी सहज शेअर केले जाऊ शकतात.

खास व्यक्तीचे चॅट्स करा लॉक

व्हॉट्सॲपचा वापर करताना आपल्या मनात एकच भिती असते की, आपले वैयक्तिक चॅट्स दुसऱ्या व्यक्तीने बघू नये. तुम्हाला देखील अशी भिती असते का? तर तुमच्यासाठी व्हॉट्सॲपवर चॅट लॉक फीचर उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या खास व्यक्तीचे चॅट्स फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हॉट्सॲप लॉक करण्याची देखील गरज नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)

काय आहे व्हॉट्सॲपचे चॅट लॉक फीचर?

व्हॉट्सॲपचे चॅट लॉक फीचर एखाद्या खास चॅटसाठी एक वेगळा फोल्डर तयार करते. हा फोल्डर ओपन करण्यासाठी फिंगरप्रिंट, फेस आईडी किंवा फोनचा पासकोड एंटर करावा लागतो. लॉक करण्यात आलेले चॅट्सचे नोटोफिकेशन देखील बंद केले जाऊ शकतात. तसेच नोटिफिकेशन चालू राहिले तरी देखील लॉक मेसेजमधील कंटेट आणि पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव देखील त्यामध्ये दिसत नाही. यामुळे प्रायव्हसी टिकून राहते.

व्हॉट्सॲपवर खास व्यक्तिचे चॅट्स लॉक करण्यासाठी वापरा या टिप्स

  • जर व्हॉट्सॲपवर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीचे चॅट्स फिंगरप्रिंटद्वारे लॉक करायचे असतील तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता.

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.

  • यानंतर तुम्हाला जे चॅट लॉक करायचे आहेत, ते चॅट ओपन करा.

  • आता संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईलवर क्लिक करा.

  • सेटिंग ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा, जिथे तुम्हाला चॅट लॉक ऑप्शन दिसेल.

  • आता लॉक थिस चॅट पर्याय ऑन करा.

  • आता फिंगरप्रिंट, फेस आईडी किंवा फोनच्या पासकोडने तुमची ओळख व्हेरिफाय करा आणि लॉक सेट करा.

  • आता लॉक करण्यात आलेले हे चॅट्स सामान्य चॅट्सच्या यादीत दिसणार नाहीत.

  • लॉक चॅट्स ओपन करण्यासाठी व्हॉट्सॲपची चॅट्स लिस्ट खालील बाजूला स्वाईप करा. आता तुमच्यासमोर लॉक चॅट्स पर्याय ओपन दिसेल.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू