Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग  
विज्ञान तंत्रज्ञान

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

Smartphone Tips: स्मार्टफोनमध्ये सतत दिसणाऱ्या जाहिरातींकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का? सावधान... स्मार्टफोनमध्ये दिसणाऱ्या या जाहिरातींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. या जाहिराती कशा बंद केल्या जाऊ शकतात, याबाबत जाणून घेऊया.

हर्षदा जाधव
  • स्मार्टफोनवर दिसणाऱ्या या जाहिरातींकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा
  • ॲप ओपन न करता फुल स्क्रीन जाहिरात दिसणं धोक्याचे संकेत असू शकतात
  • संशयास्पद ॲप, ब्राऊझर नोटिफिकेशन किंवा ॲडवेअरमुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते

तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर देखील सतत जाहिराती दिसत आहेत का? स्मार्टफोन पाहात आहात की जाहिरातींचे वर्तमानपत्र, असं तुम्हाला देखील वाटू लागलं आहे का? स्मार्टफोनवर दिसणाऱ्या या जाहिरातींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. स्मार्टफोनवर दिसणाऱ्या या जाहिरातींकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा. कारण तुमच्या या एका छोट्या चुकीमुळे फार मोठं नुकसान होऊ शकतं.

स्मार्टफोनचा वापर करताना होम स्क्रीनवर कोणताही ॲप ओपन न करता फुल स्क्रीन जाहिरात दिसत असेल तर हे धोक्याचे संकेत असू शकतात. एखाद्या संशयास्पद ॲप, ब्राऊझर नोटिफिकेशन किंवा ॲडवेअरमुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत मोबाईलमधील ॲप्स आणि सेटिंग तपसाणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

ॲप ओपन न करताच जाहिराती दिसणं

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही ॲप ओपन केला नसेल आणि तरी देखील तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जाहिराती दिसू लागल्या तर... हा एक धोक्याचा संकेत असू शकतो. अनेकदा काही ॲप्स स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर अशी समस्या पाहायला मिळू शकते. त्यामुळे जर नुकताच तुम्ही कोणता ॲप डाऊनलोड केला असेल आणि त्यानंतर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये अशी समस्या जाणवू लागली असेल तर त्वरित संबंधित ॲप फोनमधून डिलीट करा. यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करायला विसरू नका.

वारंवार नोटिफिकेशनमध्ये जाहिराती दिसणं

काही वेबसाईट्स आणि ॲप्स नोटिफिकेशनद्वारे वारंवार जाहिराती पाठवतात. जर मोबाईलच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये वारंवार अनोळखी ऑफर्स आणि जाहिराती दिसत असतील तर सर्वात आधी या नोटिफिकेशन कोणत्या ॲप्सवरून पाठवल्या जात आहेत, याची माहिती मिळवा. यानंतर संबंधित ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन बंद करा.

फोनच्या होम स्क्रीनवर दिसू लागल्या जाहिराती

जर तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर वारंवार जाहिराती दिसत असतील तर फोनमधील संशयास्पद ॲप्स किंवा थर्ड पार्टी लाँचर तपासा. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन अलीकडेच इंस्टॉल करण्यात आलेले ॲप्स तपासा. संशयास्पद ॲप्स डिलीट करा.

संशयास्पद पॉप-अपवर क्लिक करू नका

फोनचा ब्राउझर आपोआप उघडू लागला किंवा अनोळखी वेबसाइट्सवर रीडायरेक्ट केले जात असेल, तर ब्राउझरची साइट सेटिंग्ज आणि नोटिफिकेशन परवानग्या तपासा. अनोळखी वेबसाइट्ससाठीच्या परवानग्या तात्काळ रद्द करा आणि तुमचा ब्राउझिंग डेटा साफ करा. कोणत्याही संशयास्पद पॉप-अपवर क्लिक करू नका.

जाहिरातींपासून सुटका कशी मिळवाल?

  • सर्वात आधी अलीकडेच इंस्टॉल करण्यात आलेले संशयास्पद ॲप्स डिलीट करा.
  • गूगल प्ले स्टोअरमधून प्ले प्रोटेक्ट स्कॅन करा.
  • फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा.
  • कोणत्याही अनोळखी वेबसाईटवरून एपीके फाईल डाऊनलोड करू नका.
  • संशयास्पद ॲप्सना आवश्यक असलेल्याच परवानग्या द्या.

kamathipura: कामाठीपुरा बदलणार! पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग, नोंदणी केंद्र सुरू

IND vs NZ: आधी संघाला सावरले, मग इतिहास घडवला! ५० व्या कसोटीत Tom Blundellचा धमाका; भारताविरुद्ध झळकावले ऐतिहासिक अर्धशतक

IFFI Gala Premiere : IFFI 2026 मध्ये मराठी चित्रपटाचा डंका; ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा

Colgate Visible White Purple : जाहिरातींऐवजी आता थेट ड्रामा सिरीज! कोलगेट व्हिजिबल व्हाइट पर्पलची ६ भागांची मायक्रो-ड्रामा सिरीज लाँच