जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत 999 रुपये
जिओच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 98 दिवसांची
संपूर्ण रिचार्ज प्लॅन व्हॅलिडीटीदरम्यान यूजर्सना एकूण 196GB डेटा मिळणार
तुम्ही देखील जिओचे सिमकार्ड वापरता का? तुम्ही देखील अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहात का जो दिर्घकाळ व्हॅलिटीडी, डेटा फायदे आणि ओटीटी सब्सक्रिप्शन ऑफर करेल? तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिओ त्यांच्या यूजर्सना एक दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटी, हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत
जिओच्या पोर्टफोलिओमधील या रिचार्ज प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटीसोबतच इतर फायदे देखील मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये ओटीटी सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 98 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. या संपूर्ण रिचार्ज प्लॅन व्हॅलिडीटीदरम्यान यूजर्सना एकूण 196GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तसेच, पात्र ग्राहकांना या प्लॅनसह अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे. यासोबतच, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, हा प्लॅन खरेदी केल्यानंतर यूजर्सना कॉलिंग आणि एसएमएससाठी वेगळा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
फ्री डिजिटल सब्सक्रिप्शन
इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये फ्री डिजिटल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. यामुळे तुम्ही तुमचे आवडते चित्रपट, वेब सिरीज आणि कार्यक्रम कधीही आणि कुठेही पाहू शकणार आहात. यासोबतच, या प्लॅनमध्ये जिओएआयक्लाऊडवर 50GB फ्री स्टोरेज देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या या सर्व फायद्यांसोबतच 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट देखील मोफत मिळणार आहे, ज्याची किंमत 1,590 रुपये आहे. कॅन्व्हा प्रो लाईटच्या मदतीने यूजर्स डिझाईन आणि क्रिएटिव्हसह कंटेट तयार करण्यासाठी एक्स्ट्रा टूल्सचा वापर करू शकणार आहेत.