अधिक काळ फोन टिकून राहण्यासाठी खरेदी करताना 'या' गोष्टी तपासा 
विज्ञान तंत्रज्ञान

७ वर्षांपेक्षा अधिक काळ फोन टिकून राहण्यासाठी खरेदी करताना 'या' गोष्टी आवर्जून तपासा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

फोनमधील नवीन अपडेट्समुळे नवीन वैशिष्ट्ये, सुधारित कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित होत असते. जुन्या फोनवर अपडेट्सच्या अभावामुळे सुरक्षेचा धोका वाढतो, ज्यामुळे बँकिंग आणि वैयक्तिक डेटा असुरक्षित राहण्याची जास्त शक्यता असते.

सुरुची कदम

आजकाल लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल कायमच असतो. लहान मुलं मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत नाहीत. फोन विकत घेताना कायमच त्याचा कॅमेरा, रॅम आणि किती जीबी स्टोरेज आहे, याच गोष्टींची काळजी घेतली जाते. पण त्याव्यतिरिक्त फोन अधिक काळ टिकून राहण्यासाठी या गोष्टी आवर्जून तपासणे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा तुमचा फोन वर्षभरात सुद्धा खराब होऊ शकतो. स्मार्टफोन खरेदी करताना, दीर्घकालीन सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स तपासणे आवश्यक आहे.

फोनमधील नवीन अपडेट्समुळे नवीन वैशिष्ट्ये, सुधारित कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित होत असते. जुन्या फोनवर अपडेट्सच्या अभावामुळे सुरक्षेचा धोका वाढतो, ज्यामुळे बँकिंग आणि वैयक्तिक डेटा असुरक्षित राहण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नवीन फोन खरेदी करताना त्यातील वैयातिक्त सुरक्षा अपडेटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऑपरेटिंग सिस्टम (OS) अपडेट्समुळे नवीन वैशिष्ट्ये, इंटरफेस सुधारणा, कार्यक्षमतेत सुधारणा आणि नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगतता जोडली जाते. सुरक्षा अपडेट्समुळे त्रुटी दूर होतात, ज्यामुळे वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील आणि खाजगी संवाद उघड होऊ शकतात. या अपडेट्समुळे तुमच्या स्मार्टफोनचे उपयुक्त आयुष्य वाढते.

स्मार्टफोनच्या वाढत्या किमती, केवळ बाह्य स्वरूपातील बदल आणि डेटा सुरक्षेबद्दल मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळे या युगात, वापरकर्ते दीर्घकाळ निश्चिंतपणे वापरू शकतील अशाच मोबाईल फोनला मोठी मागणी आहे. सॅमसंग आणि गुगलसारख्या कंपन्या आता सहा ते सात वर्षांसाठी ओएस आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देते, मुळे हे फोन्स एक दीर्घकालीन आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय बनत आहेत.

स्मार्टफोन खरेदी करताना तो दोन ते तीन वर्ष टिकून राहावा, एवढीच अपेक्षा केली जाते. दोन ते तीन वर्षे फोन वापरल्यानंतर तो पुन्हा एकदा बदलला जातो. पूर्वी दोन ते तीन वर्षानंतर सॉफ्टवेअर अपडेट्स थांबायचे, ज्यामुळे नवीन ॲप्स चालवणे कठीण होऊन जायचे. मात्र हा ट्रेंड हळूहळू बदलत चालला आहे. वारंवार अपग्रेड करण्यास प्रोत्साहन देण्याऐवजी, कंपन्या ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट वाढवत आहेत, ज्यामुळे अधिक कालावधीसाठी सुरक्षा अपडेट्स मोबाईलमध्ये चालू आहेत. सात वर्षांचे सुरक्षा अपडेट्स आणि सात मोठे ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड्स दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ओएस अपग्रेड्स मिळणे बंद झाल्यानंतरही सुरक्षा सपोर्ट सुरू राहू शकतो.

Political News : "... पण त्यांनी माती खाल्ली", संजय राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा

India vs Malaysia: भारताच्या वाघिणींचा हल्लाबोल! मलेशियाला ६-२ ने चारली धूळ; टीम इंडियाचा फायनलमध्ये सहाव्यांदा दिमाखात प्रवेश

Good Sleep Tips: रात्री चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'या' ५ गोष्टी; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Blinkit App Privacy Controversy: तुमच्या फोनमधील अ‍ॅप्सवर Blinkit ची नजर? बॅटरी आणि Wi-Fi बाबतही मोठा दावा!

आता 112 प्रकारचे आजार, शस्त्रक्रियांवर सरकारी रुग्णालयांत उपचार; मात्र डॉक्टरांअभावी उपचाराचा प्रश्न