राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री... तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत  
विज्ञान तंत्रज्ञान

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री... तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

OnePlus 16 Launched: वनप्लसने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 9000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

हर्षदा जाधव
  • OnePlus 16 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच
  • नवीन स्मार्टफोन OnePlus 15 ला रिप्लेस करणार
  • स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये

OnePlus Smartphone Launched: चीनमध्ये OnePlus 16 हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 15 ला रिप्लेस करणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने मागील मॉडेलसारखाच स्क्वेअर शेप रियर कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. स्मार्टफोनची बॅटरी, डिझाईन आणि चिपसेट अपग्रेड करण्यात आला आहे. या वनप्लस स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये या महिन्यापासून सुरु होणार आहे.

वनप्लस 16 ची किंमत

वनप्लस 16 स्मार्टफोनच्या 12जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,799 म्हणजेच सुमारे 97,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आहे. 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,21,000 रुपये आहे. या फोनची विक्री चीनमध्ये 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन टुमॉरोज स्टार, मार्शियन मास्टरपीस आणि डार्क फॉरेस्ट या रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य: OnePlus) 

वनप्लस 16 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये 185Hz रिफ्रेश रेटवाला 6.78-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेनसिटी 450 पीपीआय, लोकल पीक ब्राइटनेस 2,000 निट्स, 100 टक्के जीसिआय-P3 कलर गॅमट, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि 3,840Hz पर्यंत पीडब्ल्यूएम डीसी डिमिंग फ्रीक्वेंसीला सपोर्ट करतो. हा फोन IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. वनप्लस 16 स्मार्टफोन डुअल - सिमसह उपलब्ध आहे, जो अँड्रॉईड 17 वर आधारित ओप्पोच्या लेटेस्ट कलरओएस 17 वर चालतो.

चिपसेट

वनप्लस 16 मध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेट देण्यात आला आहे. याच्या प्रोसेसरची पीक क्लॉक स्पीड 5.01GHz पर्यंत आहे. यासोबतच या फोनमध्ये ॲड्रेनो 850 जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, आणि 1TB चे यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. नव्या वनप्लस स्मार्टफोनमध्ये फोन ट्राई-गेमिंग चिप सेटअप - P4 सुपर डिस्प्ले चिप, लिंगक्सी टच चिप, आणि G3 ई-स्पोर्ट्स नेटवर्क देण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअप

नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो ओप्पो लुमो इमेजिंगला सपोर्ट करतो. यामध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.6) प्रायमरी शूटर दिला आहे, जो ड्युअल एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 116-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड रियर कॅमेरा आणि 120x डिजिटल झूमवाला 50-मेगापिक्सेल (f/2.6) टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. हा 3X ऑप्टिकल झूमला देखील सपोर्ट करतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4K/60 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

बॅटरी

वनप्लस 16 मध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह 9,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बायडू, क्यूझेडएसएस, आणि गॅलिलिओ देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Untitled Nov 27, 2026 07:10 pm

IND vs NZ: आधी संघाला सावरले, मग इतिहास घडवला! ५० व्या कसोटीत Tom Blundellचा धमाका; भारताविरुद्ध झळकावले ऐतिहासिक अर्धशतक

IFFI Gala Premiere : IFFI 2026 मध्ये मराठी चित्रपटाचा डंका; ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा

Colgate Visible White Purple : जाहिरातींऐवजी आता थेट ड्रामा सिरीज! कोलगेट व्हिजिबल व्हाइट पर्पलची ६ भागांची मायक्रो-ड्रामा सिरीज लाँच