बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश  
विज्ञान तंत्रज्ञान

बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश

Redmi Note 15 SE 5G Launched: फोन तीन कलर ऑप्शन आणि तीन स्टोरेज ऑप्शमध्ये सादर करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच (1,080x2,392 पिक्सेल) कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला आहे.

हर्षदा जाधव
  • Redmi Note 15 SE 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये असून तो तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz कर्व्ड AMOLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत रॅम दिली आहे.
  • 50MP कॅमेरा, 5,800mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरतो.

Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीनो भारतात बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीने भारतात Redmi Note 15 SE 5G नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, ही स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 15 5G चे स्पेशल एडिशन आहे. ग्राहक लवकरच हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकणार आहेत. Redmi Note 15 SE 5G या नवीन स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Redmi Note 15 SE 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीचा नवीन रेडमी स्मार्टफोन भारतात 6GB+128GB, 8GB+ 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये, 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी निवडक कार्ड्सवर 2,000 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे. डिव्हाईसची विक्री 7 एप्रिलपासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवरून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Redmi)

Redmi Note 15 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

रेडमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच (1,080x2,392 पिक्सेल) कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 240Hz चा टच सँपलिंग रेट देखील दिला आहे. Redmi Note 15 SE 5G मध्ये 3,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि DCI-P3 कलर गॅमेट देण्यात आला आहे. डिव्हाईस शाओमीच्या अँड्रॉईड 15-बेस्ड हायपरओएस 2 वर चालतो. तसेच या स्मार्टफोनला टीयूवी राइनलँड लो ब्लू लाइट, सर्केडियन फ्रेंडली आणि फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन्स देखील मिळाले आहे.

पाणी आणि धूळीपासून संरक्षण करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 + IP66 रेटिंग दिली आहे. रेडमी डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट दिला आहे, जो 2.4GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये एड्रेनो जीपीयू, 8GB पर्यंत एलपीडीडीआर4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे.

यूजर्सना फोटोग्राफीचा अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. यामध्ये 1/2.88-इंच लाइट हंटर 400 सेन्सर असलेला 50-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या डिव्हाइसमध्ये 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. फोनच्या समोरच्या बाजूला सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा (f/2.2) कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 5,800mAh बॅटरी आणि 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Share Market Today: आज कोणते शेअर्स चमकणार? टाटा ग्रुपसह या कंपन्यांच्या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

राज्यातील 7 कोटी फ्लॅटना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; फ्लॅटवरील बोजे, कायदेशीर अडचणींचीही होणार नोंद

Panch Mahapurush Yog: कुंडलीतील हे ५ महापुरुष योग देतात राजासारखे सुख! जाणून घ्या त्यांचे महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रीय फायदे

Shraddha Kapoor Marathi Look: ५ लाखांचा चोकर, दीड लाखांची साडी अन्... श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकची किंमत ऐकून बसेल धक्का!

Maharashtra Zero Bureaucracy: महाराष्ट्रात 'शून्य नोकरशाही' उपक्रमाला सुरुवात! UAE च्या धर्तीवर १७४ डिजिटल सेवांचा शुभारंभ