Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
वसई-विरार महापालिकेच्या नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्याच्या प्रस्तावाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे. नाट्यगृहाला ज्येष्ठ रंगकर्मी मास्तर दत्ताराम वालावलकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्राजक्ता प्रधान
वसई-विरार महापालिकेच्या नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. याऐवजी नाट्यगृहाला ‘मास्तर दत्ताराम वालावलकर’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.