World

भारताचाच भाग असलेल्या 'अक्साई चीन'मध्ये आता शत्रूची नवी चाल, लडाखपासून नेपाळपर्यंतचा भाग ताब्यात घेण्याची तयारी सुरु, वाचा नेमंक काय घडतंय?

भारताचा शेजारी देश चीन अक्साई चिनमधून जाणारा आणखी एक महामार्ग बांधण्याचा विचार करत आहे. जे भारताच्या सीमेवरून शिनजियांगला तिबेटशी जोडेल.

Pravina Shirpurkar

बीजिंग : लडाखवर (Ladakh) डोळा ठेवून चीनने आता अक्साई चीनमधील (Aksai Chin)  पॅंगॉन्ग तलावापर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याची तयारी सुरू केली आहे. चीनचा हा महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्ग  शिंजियांग आणि तिबेटला जोडणार आहे. हा चिनी रेल्वे मार्ग अक्साई चीनमध्ये भारताला लागून असलेल्या LAC च्या अगदी जवळून जाईल. या रेल्वे मार्गाची माहिती तिबेट स्वायत्त प्रदेश सरकारने दिली आहे. चिनी रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा (China Railway) 2025 पर्यंत पूर्ण होईल आणि तो Xiagtse ते Pakhutso पर्यंत धावेल. उर्वरित रेल्वे मार्ग होटनपर्यंत जाईल आणि 2035 पर्यंत पूर्ण होईल.

द हिंदून दिलेल्या वृत्तानुसार, चीनकडून तिबेटसाठी मध्यम आणि दीर्घकालीन रेल्वे योजना गेल्या आठवड्यात सार्वजनिक करण्यात आली. या अंतर्गत हा रेल्वे मार्ग 2025 पर्यंत 1400 किमीवरून 4000 किमीपर्यंत वाढवायचा आहे. चीनचे नवे रेल्वेचे जाळे भारत आणि नेपाळच्या सीमेवरून जाणार आहे. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे शिनजियांग-तिबेट रेल्वे मार्ग. हा रेल्वे मार्ग G219 राष्ट्रीय महामार्गावरून जाईल.

अक्साई चिन म्हणजे काय?

हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. जो चीनला पाकिस्तानने दिला. हा भूभाग संपूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली असून शिंच्यांग स्वायत्त प्रदेशाच्या होताना जिल्ह्याचा हा भाग आहे. भारत सरकारने अक्साई चिन भारताच्या जम्मू आणि काश्मिर राज्यातील लडाख जिल्ह्याचा भाग असल्याचा दावा केला आहे. १९५९ सालापासून दोन्ही देशांनी वास्तविक नियंत्रण रेषेचा स्वीकार केला आहे. अक्साई चिन व अरुणाचल प्रदेश हे दोन भारत व चीन देशांमधील सीमावादाचे मुद्दे आहेत.

अक्साई चिनवर कुणाचा दावा

भारत लडाखमधील अक्साई चिन परिसराला आपला भूभाग मानतो, परंतु तेथे चीनचे नियंत्रण आहे. 1962 च्या युद्धात चीनने तेथील सुमारे 38,000 चौरस किलोमीटर भूभाग बळकावल्याचा भारताचा दावा आहे. चीन अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन रेषा स्वीकारत नाही आणि अक्साई चीनवरील भारताचा दावाही नाकारतो.

नेपाळपासून भारत आणि भूतानपर्यंत धावणार  रेल्वे

यामुळे चीनच्या दोन्ही प्रांतांच्या राजधान्यांमधील अंतर 12 तासांपर्यंत कमी होईल, जे आता 36 तासांवर आले आहे. या योजनेनुसार आता नेपाळ आणि चीनमधील भूमी बंदर असलेल्या गीरोंगपर्यंत सीमा रेल्वे मार्ग बांधला जाईल. ते भारताच्या सिक्कीम आणि भूतानच्या सीमेजवळ असलेल्या चुंबी खोऱ्यातील याडोंग काउंटीपर्यंत जाईल. या विशाल रेल्वेमार्गाद्वारे चीन सीमावर्ती भागांना जोडेल, त्यामुळे चीन सीमेवरील सुरक्षा वाढवू शकेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळे तिबेट आर्थिकदृष्ट्या मुख्य भूभाग चीनशी जोडला जाईल.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू